घरमुंबईएसएनडीटी विद्यापीठाचा आज दीक्षांत समारंभ

एसएनडीटी विद्यापीठाचा आज दीक्षांत समारंभ

Subscribe

देशातील पहिले महिला विद्यापीठ म्हणून मान मिळालेल्या एसएनडीटी विद्यापीठाचा 69 वा दीक्षांत समारंभ 18 जानेवारीला सकाळी 11 वाजता होणार आहे. दीक्षांत समारंभात 13 हजार 904 विद्यार्थिनींना पदवी व पदविका प्रदान करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या चर्चगेट येथील कॅम्पसमधील सर सीतााम तथा लेडी शांताबाई पाटकर दीक्षांत सभागृहात होणार आहे.

एसएनडीटी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला राज्यपाल व विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. सामाजिक उद्योजक आणि उद्यमिता विद्यापीठ, जे.पी. फाऊंडेशन ऑफ सोशलवर्कच्या संस्थापक -संचालिका डॉ. नंदिता पाठक या प्रमुख अतिथी असतील. पदवी व पदविका प्रदान करण्यात येणार्‍या विद्यार्थिनींनीमध्ये स्नातक पदवीचे प्रमाण सर्वाधिक 11हजार 197 असून, त्याखालोखाल पदवी 2 हजार 167, पदव्युत्तर-पदविका 149, डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र 325 आणि पीएचडीच्या 66 विद्यार्थिनी आहेत. त्याचबरोबर 120 विजेत्यांमध्ये 62 सुवर्णपदके व 86 बक्षिसे देण्यात येतील. समारंभात चार विद्याशाखांतर्गत 143 पदवी आणि पदविका प्रदान करण्यात येईल.

- Advertisement -

यावेळी एसएनडीटी विद्यापीठातर्फे राष्ट्रसेविका समितीच्या प्रमिला मेढे व सुप्रसिद्ध लेखिका व कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांना डॉक्टर ऑफ लेटर्स (हॉनोरिस कोर्स) पदवी प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू विष्णू मगरे हे उपस्थित राहणार आहेत. समारंभाचे थेट प्रक्षेपण www.estv.in/sndt या संकेतस्थळावर होणार आहे.

पीएचडी मिळवणार्‍या विद्यार्थिनींच्या संख्येत वाढ
विद्यापीठाने भाऊबीज योजनेअंतर्गत 16 लाख 60 हजारांचा निधी उभारला आहे. त्यातून 2018-19 मध्ये 10 विद्यार्थिनींना मदत केली आहे. विद्यापीठाला संशोधन आणि फेलोशिप किंवा यूजीसी, आयएसीएसएसआर अशा संस्थांकडून 7 लाख 72 हजार 811 इतका निधी मिळाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पीएचडी पदवी मिळवणार्‍या विद्यार्थिनींच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -