घरमुंबईगोरेगाव मोतीलाल नगरमध्ये लवकरच सर्वेक्षण

गोरेगाव मोतीलाल नगरमध्ये लवकरच सर्वेक्षण

Subscribe

प्रकल्पानजीकच होणार पुर्नवसनासाठीचे स्थलांतर

म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकासमंडळातर्फे राबविण्यात येणार्‍यागोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगर येथे सुरू झालेल्या सर्वेक्षणासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन मुंबई मंडळाचे सभापती मधू चव्हाण यांनी केले आहे. मोतीलाल नगर १,२ व ३ येथीलजुन्या वसाहतींचा संयुक्तपुनर्विकास प्रकल्प होणार आहे.अत्याधुनिक सोयीसुविधांनीयुक्त या प्रकल्पाची व्याप्ती जाणून घेण्यासाठी जमिनीची उपलब्धताव रहिवाशांबाबत वस्तुस्थितीनुरुप माहिती जाणून घेण्याकरिता म्हाडाकडून सुरु होणार्‍या सर्वेक्षणाला रहिवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन मधू चव्हाण यांनी गोरेगाव येथे केले आहे.

मोतीलाल नगर-१ मधील गणेश मैदान येथे मुंबई मंडळातर्फे मोतीलाल नगर १,२ व ३ या संयुक्त पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाबाबत रहिवाशांसाठी नुकतेच सादरीकरण करण्यात आले. मोतीलाल नगरमध्ये सध्या आम्ही घरोघरी सर्वेक्षणासाठीचे फॉर्म दिले आहेत. त्यामुळे येत्या दोन दिवसात हे सर्वेक्षण सुरू होईल अशी माहिती या सर्वेक्षणासाठी नेमण्यात आलेल्या कंपनीचे आर्किटेक्ट पी के दास यांनी दिली.

- Advertisement -

सुमारे १४३ एकर जमिनीवर राबविण्यात येणार्‍यामोतीलाल नगर १,२ व ३ या संयुक्त पुनर्विकास प्रकल्पाची व्याप्ती आहे. म्हणूनच हा म्हाडाचा सर्वात मोठा पुनर्विकास प्रकल्प ठरतो. या प्रकल्पाअंतर्गत सुमारे ३ हजार ७०० रहिवाशांचे अत्याधुनिक आणि मोठ्या आकाराच्या सदनिकेतपुनर्वसन केले जाणार आहे. तसेचमूळ रहिवाशांचे पुनर्वसन केल्यानंतर सुमारे४० हजार परवडणार्‍या अतिरिक्त सदनिका सर्वसामान्य नागरिकांना विक्रीसाठीउपलब्ध होणार असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली.

” मोतीलाल नगर १,२ व ३ या संयुक्त पुनर्विकासप्रकल्पातील मूळ रहिवाशांचे स्थलांतर संक्रमण शिबिरात न करता थेट नव्याने बांधण्यात येणार्‍या सदनिकांमध्ये करण्याचे नियोजन मंडळातर्फे याप्रकल्पांतर्गत करण्यात आले आहे, हीबाबया प्रकल्पाचे मुख्यआकर्षण ठरणार आहे”, अशी माहिती चव्हाण यांनी दिली.या प्रकल्पाकरिता पी. के. दास अँड असोसिएट्स यांची प्रकल्प नियोजन सल्लागार म्हणून निवड करण्यात आली असून त्यांच्यामार्फत सर्वेक्षण करण्यात येणार आहे.माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसारच हा प्रकल्प म्हाडामार्फत राबविला जात असून उद्यापासून सुरु होत असलेले सर्वेक्षण हा या प्रकल्पाचा महत्वाचा घटक आहे.

- Advertisement -

यासर्वेक्षणानंतर लाभार्थी रहिवाशांना या प्रकल्पातून उपलब्ध होऊ शकणार्‍या सुविधांबाबत स्पष्टता मिळणार आहे. या पात्र लाभार्थी रहिवाशांचे प्रथम पुनर्वसन हा या प्रकल्पाचा मुख्य केंद्रबिंदू आहे.म्हाडाने सादर केलेल्या प्रस्तावावर रहिवाशांसह पुन्हा चर्चा करून, त्यांना विश्वासात घेऊन व त्यांच्या सूचना-हरकती यांची दखल घेऊनच पुढील कार्यवाही केली जाणार आहे, असे मुंबई मंडळाचे मुख्य कार्यकाऱी अधिकारी राधाकृष्णन बी म्हणाले. रहिवाशांकडून प्राप्त होत असलेल्यासूचना, मत देखील वेळोवेळीविचारात घेतल्या जातआहेत. काही रहिवाशांनी केलेल्या सूचनेनंतरच आजचासादरीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे असेहीते म्हणाले. तसेच प्रकल्पासंदर्भात रहिवाशांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी म्हाडातर्फे विशेष मार्गदर्शन कक्ष प्रकल्पस्थळीउभारण्यात येणार असल्याची माहिती याप्रसंगी मुंबई मंडळाच्या मुख्य अधिकार्‍यांनी याप्रसंगी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -