…तर सुप्रिया सुळे यांनी राजीनामा द्यावा – चंद्रकांत पाटील

Revenue Minister Chandrakant Patil
महसूल मंत्री चंद्रकांत पाटील

लोकसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर एईव्हएममध्ये गडबड झाल्याचा आरोप विरोधक करत आहेत. जर ईव्हीएम घोटाळा झाला तर मग बारामतीचे जागा कशी काय जिकून आली? असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. त्याचबरोबर जर खरच घोटाळा झाला असे वाटत असेल तर बारामतीमधून निवडून आलेल्या सुप्रिया सुळे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली. भाजपाच्या विशेष प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीत चंद्रकांत पाटील बोलत होते. त्यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. एवढच नाही तर वंचितमुळे युतीचा विजय झाला, असे देखील काही जणांना वाटते पण हा विजय झालेल्या मतदानामुळे असून, प्रत्येक ठिकाणी आपल्याला ५१ टक्के मतदान झाल्याचे सांगत बारातमीत देखील युतीला ४१ टक्के मतदान झाल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

‘वेगळे लढले तर काँग्रेस राष्ट्रवादीला १० पेक्षा जास्त जागा मिळणार नाही’

दरम्यान युती होणार की नाही? मुख्यमंत्री कुणाचा? अशी सध्या चर्चा सुरू असून युतीचा सर्वस्वी निर्णय आपण मुख्यमंत्र्यांकडे सोपवू आणि निवडणुकीच्या कामाला लागू, असे त्यांनी कार्यकर्त्याना मार्गदर्शन करताना सांगितले. आता काँग्रेस-राष्ट्रवादी हे घाबरले आहेत आणि म्हणून ते यावेळी एकत्र लढणार पण ते वेगळे लढले तर त्यांना आता १० च्या वर जागाही मिळणार नाही, असे सांगत काँग्रेसला चॅलेंज दिले. म्हणूनच काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र लढत असल्याने आपल्याला युतीत लढले पाहिजे, असे चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.

‘युतीची चिंता नको’

काही जण म्हणतात आम्ही युतीत आहोत. पण भांडत असतो. पण दोन भाऊ प्रॉपर्टीसाठी भांडतात. तसं आपण भांडत असलो तरी आपण सोबत असणार असे सांगत युतीची चिंता करू नका, असे देखील ते म्हणाले. आपण २८८ जागांची तयारी करू. युती होणार का हे देवेंद्र फडणवीस बघून घेतील, असे सांगत
मुख्यमंत्री यांच्याकडे दैवी शक्ती असल्याचे ते म्हणालेत. अमित शाह यांना प्रदेशातील प्रत्येक गोष्ट माहीत असल्याचे देखील ते म्हणाले.

‘कार्यकर्त्यांना कायमच महत्व’

भाजपामध्ये नव्याने आलेल्या लोकांमुळे जुन्या लोकांवर अन्याय होतो, अशी टीका होते. पण नवीन लोकांना घेत असताना जुन्या लोकांना कुठेही डावलले जात नाही असे सांगत मंत्री मंडळात कोणीही नवीन नाही, फक्त विखे पाटील हे नवीन आहेत, असे देखील ते म्हणालेत.