पाकिस्तानमधून ताज हॉटेल उडवण्याची धमकी; मुंबई पोलिसांनी सुरक्षा वाढवली

Mumbai
ताज हॉटेल

पाकिस्तान कराचीमधून मुंबईतील ताज हॉटेलमध्ये धमकीचा फोन आल्याची खळबळजनक माहिती समोर येत आहे. या कॉलनंतर मुंबई पोलिसांनी ताज हॉटेल परिसरातील सुरक्षा वाढवली आहे. हा फोन कॉल फेक आहे की नाही याचीही पडताळणी पोलीस करत आहेत. कराची स्टॉक एक्सचेंजच्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता मुंबईतील ताज हॉटेलवर दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबईतील ताज हॉटेल बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा फोन आला असून हा फोन पाकिस्तानमधून ताज हॉटेलमध्ये करण्यात आला होता.

हॉटेल ताज उडवण्यात येणार असल्याची धमकी आज पहाटे रिसेप्शन काउंटर असलेल्या टेलिफोन वर आली होती. हॉटेल ताज प्रशासनकडून याबाबत मुंबई पोलिसांना या धमकीबाबत कळवण्यात आले असून अद्याप कुलाबा पोलीस ठाण्यात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याची पोलीस सूत्रांनी दिली. ताज परिसरात बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली असून त्या परिसरात येणारी वाहनांची तपासणी करण्यात येत आहे, तसेच ताजमध्ये येणाऱ्या प्रत्येकाची चौकशी करण्यात येत आहे. हॉटेल ताजच्या रिसेप्शन काउंटरला आलेल्या धमकीच्या कॉलमध्ये पाकिस्तानचा उल्लेख करण्यात आला असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

ताज हॉटेलला आलेल्या कॉल डिटेल्स तपासले जात असून पाकिस्तानच्या शेअरमार्केट वर नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ताज हॉटेलला आलेल्या धमकीकडे गंभीरतेने बघितले जात आहे. राज्य दहशतवाद विरोधी पथक, मुंबई गुन्हे शाखा तसेच इतर सुरक्षा यंत्रणेला अलर्ट राहण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आले आहे.

२६/११ चा दहशतवादी हल्ला

या पूर्वी २६ नोव्हेंबर २००८ साली मुंबईत दहशतवादी हल्ला झाला होता. दहा दहशतवाद्यांनी समुद्रामार्गे मुंबईत प्रवेश करत बेछुट गोळीबार करण्यात सुरूवात केली होती. ताज हॉटेलमध्ये दोन दहशतवाद्यांनी घुरखोरी करत तेथील सर्वांना वेठीस धरले होते. कित्येक तास त्या दहशतवाद्यांशी मुंबई पोलीस आणि जवान झुंज देत होते. त्यामुळे पुन्हा एकदा ताजवर हल्ल्याची धमकी आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून तेथील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

हेही वाचा –

खुशखबर! भारतात कोरोनावर पहिली लस आली; जुलैपासून मानवी चाचणी

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here