घरताज्या घडामोडीCyclone Nisarga: कल्याण खाडी किनारी असलेल्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन!

Cyclone Nisarga: कल्याण खाडी किनारी असलेल्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन!

Subscribe

निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा मुंबई समुद्र किनाऱ्या लगत असलेल्या परिसराला तसेच पालघर, डहाणू या भागाला देखील बसणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्याच धर्तीवर मुंबईला लागून असलेल्या कल्याण खाडीच्या किनाऱ्याजवळ गावांनी सतर्क रहावे असे आवाहन कल्याण तहसीलदार दीपक आकडे यांनी केले आहे.

निसर्ग चक्रीवादळ मुंबई किनाऱ्याला धडकणार असे हवामान विभागाने जाहीर केले आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील मुंबईसह रत्नागिरी, रायगड, येथील हरेहरेश्वर, हर्णे तसेच पालघर, अर्नाळा येथे देखील वादळाचा आणि नंतर येणाऱ्या अतिमुसळधार पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या धर्तीवर परिसरात एनडीआरएफची टीम पाठविण्यात आली आहे. या सर्व बाबींचा विचार करून कल्याण तहसीलदार दीपक आकडे यांनी कल्याण खाडी किनारी असलेल्या मांडा, अटाळी, गुरवली, नांदटर, गंधारी, सांगे किरवली, पिसाडॅम, सांगोडा, कोढेरी, वासुद्री, मोस, चौधरपाडा, बापगाव, पिंपळास, देवरुंग, आदी गावांना सावध रहाण्याचा आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे मला तहसीलदार दीपक आकडे यांनी केले आहे.

- Advertisement -

ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुका हा महत्त्वाचा तालुका आहे तालुक्याच्या पश्चिमेस ठाणे, भिवंडी, उत्तरेला शहापूर भिवंडी, पुर्वेस शहापूर मुरबाड तर दक्षिणेस उल्हासनगर आणि रायगड जिल्हाची हद्द आहे. मुंबईपासून केवळ ४५ किमी अंतर असून कल्याण शहराच्या पश्चिम भागालगत आणि भिवंडी तालुक्याचे पुर्व भागालगत आणि डोंबिवली, दिवा भागालगत खाडी आहे. त्यामुळे या सर्वांनी सतर्क आणि सावध रहावे असे अवाहन केल्याचे तहसीलदार दीपक आकडे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -