घरमुंबईठाकरे vs ठाकरे

ठाकरे vs ठाकरे

Subscribe

मनसेचे महाअधिवेशन तर शिवसेनेची वचनपूर्ती

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती गुरुवारी साजरी केली जात असतानाच मुंबईत मात्र राजकीय धुरळा उडणार आहे. मुंबईत गुरुवारी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. तब्बल १४ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर मनसेने आपल्या झेंडा बदलण्याचा निर्णय घेतला असून या अधिवेशनात अनेक राजकीय ठराव केले जाणार आहेत. उभ्या महाराष्ट्राचे लक्ष मनसेच्या नव्या भूमिकेवर लागून राहिले आहे. तर दुसरीकडे बाळासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना दिलेला शब्द खरा करुन दाखविल्याने शिवसेनेने जल्लोष मेळाव्याचे आयोजन केले आहे. त्यामुळे गुरुवारी मुंबईत मनसे विरोधात शिवसेना असा सामना रंगणार आहे. दरम्यान, मनसेच्या अधिवेशनात राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचे देखील लॉचिंग होण्याची शक्यता आहे.

मुंबईसह महाराष्ट्राला गेल्या अनेक दिवसांपासून मनसेच्या नव्या झेंड्याची चर्चा सुुरु झाली होती. त्याबाबतचे वृत्त प्रथम ‘आपलं महानगर’ने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर मनसैनिकांचे लक्ष या महाअधिवेशनावर लागून राहिले आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मदिनी मनसेकडून पहिल्यांदाच हे अधिवेशन आयोजित केल्याने याबाबत अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. मुंबईतील गोरेगाव इथल्या एक्झिबिशन सेंटर इथे सकाळी 9 वाजता या अधिवेशनाला सुरुवात होईल. यावेळी मनसेचा झेंडा आणि अजेंडा बदलण्याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. महाराष्ट्र धर्माला आता मनसेच्या अजेंड्यात स्थान देण्यात येणार आहेत.

- Advertisement -

असून त्यामुळेच मनसेच्या झेंड्याचा रंग भगव्या असणार आहे. त्यावर सोनेरी रंगाच्या षट्कोनात राजमुद्रेप्रमाणे महाराष्ट्र धर्म लिहिले असल्याची शक्यता आहे. सुलेखनकार अच्युत पालव यांनी हे डिझाईन केले आहे. मात्र राजमुद्रेला संभाजी ब्रिगेडने विरोध केला आहे. त्यामुळे मनसेचा नवा झेंडा नेमका कसा असणार हे पाहणे औत्सुक्याचे असेल. या महाअधिवेशनात राज ठाकरे नेमकी काय भूमिका मांडतात उत्सुकता आहे. सकाळी ९ वाजल्यापासून सुरु होणार्‍या या अधिवेशनाचे उद्घाटन राज ठाकरेंच्या हस्ते होणार आहे. यावेळी मनसेचा नवीन झेंडा आणि मनसेच्या नवीन दिशाचे (टॅगलाईन ) अनावरण करण्यात येणार आहे. त्यानंतर मनसेचे प्रमुख वक्ते आणि नेते यांची भाषण होणार आहेत. त्यावेळी विविध विषयांवर पक्षाची काय भूमिका असली पाहिजे, याबाबत ठराव मांडले जातील.

तर दुसरीकडे वांद्रे येथील एमएमआरडीए ग्राऊंडवर शिवसेनेकडून जल्लोष साजरा करण्यात येणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांना दिलेले वचन पूर्ण करणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ११ शिवसैनिकांमार्फत सत्कार करण्यात येणार आहे. तसेच यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते सेनेच्या मंत्र्यांचा सत्कार देखील करण्यात येणार आहे. त्यामुळे शिवसेनेने देखील या जल्लोष महोत्सवासाठी रणशिंग फुंकले असून जोरदार शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असल्याने ते नेमकं काय बोलतात याकडे शिवसैनिकांसह सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम देखील होणार असून यावेळी तब्बल ३० कलाकार मंडळी हजेरी लावणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -