घरमुंबईआत्महत्या प्रवृत्तांना सिव्हिलचा आधार; ८७ जणांना केले आत्महत्येपासून परावृत्त

आत्महत्या प्रवृत्तांना सिव्हिलचा आधार; ८७ जणांना केले आत्महत्येपासून परावृत्त

Subscribe

कौटुंबिक कलह, आर्थिक अडचण, शिक्षण अथवा नोकरीत अपयश, अपमानास्पद वागणूक आदींमुळे नैराश्य आल्याने अनेकजण आत्महत्येच्या मार्ग अवलंबतात. अशावेळी त्यांना मानसिक आधाराची खूपच गरज असते. ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयातील आत्महत्या प्रतिबंध केंद्र हे त्यांंच्यासाठी आधार ठरले आहे

कौटुंबिक कलह, आर्थिक अडचण, शिक्षण अथवा नोकरीत अपयश, अपमानास्पद वागणूक आदींमुळे नैराश्य आल्याने अनेकजण आत्महत्येच्या मार्ग अवलंबतात. अशावेळी त्यांना मानसिक आधाराची खूपच गरज असते. ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयातील आत्महत्या प्रतिबंध केंद्र हे त्यांंच्यासाठी आधार ठरले आहे. गेल्या आठ महिन्यांत आत्महत्येस करू पाहणार्‍या ८७ रुग्णांना आत्महत्येपासून परावृत्त करण्याचे काम त्यांनी केले आहे. गेल्यावर्षी ११७ जणांचे समुपदेशन करण्यात आले होते.

आत्महत्यांच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून दरवर्षी हजारो लोकांनी आपला जीव गमावला आहे. त्याची दखल घेत ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयाच्या मानसिक आरोग्य विभागाकडून आत्महत्या प्रतिबंध केंद्र सुरू केले आहे. या केंद्रातून समुपदेशन आणि आषधोपचाराचे मार्ग अवलंबले जातात. सध्या या विभागात मानसोपचार तज्ञ, मानसशास्त्रज्ञ, समाजसेवक. अधीक्षक अशी टीम कार्यरत आहे. सिव्हिल रुग्णालयात गेल्या आठ महिन्यांत ८७ रुग्ण दाखल झाले होते. त्यात ३० पुरुष आणि ५७ महिला होत्या. उंदीर मारण्याचे औषध, फिनेल, ब्लेडने नस कापणे आदी मार्गाचा वापर करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. या रुग्णावर प्रथमोपचार केल्यानंतर, आत्महत्या केंद्राकडून त्यांचे समुपदेशन करून, त्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्याचे काम करण्यात आले, अशी माहिती या केंद्राचे समाजसेवा अधीक्षक श्रीरंग सिद यांनी दिली. कौटुंबिक कलह, समाजातील हरवलेला संवाद, नैराश्य, जुना आजार या गोष्टी आत्महत्येस कारणीभूत ठरतात. विचार करून मेंदूतील जीव रसायन कमी होतात. रासायनिक बदलला औषधांची गरज असते. त्यामुळे औषधोपचार आणि समुपदेशन दोन्ही केले जाते असेही सिद यांनी सांगितले. ‘आत्महत्या टाळण्यासाठी एकत्रित काम करूया ! ’ अशी यंदाची थीम आहे असेही त्यांनी सांगितले. आत्महत्या हे मानसिक आरोग्याशी संबधित आहे. सिव्हिल रुग्णालयातील मानसोपचार विभागाकडून मोफत मार्गदर्शन आणि समुपदेशन केले जाते, त्यामुळे अशा नागरिकांनी सिव्हिल रुग्णालयाशी संपर्क साधावा असे आवाहनही सिद यांनी केले आहे.

आत्महत्येला कोणतेही कारण नसते. अकारण आत्महत्येचा विचार येऊ शकतो. नैराश्यमुळे नकारात्मक विचार मनात येतात. साधारण 20 ते 30 वयोगटात आत्महत्येचे प्रमाण दिसून येते. लहान मुलांमध्ये नैराश्य येते. तसेच मतिमंद मुलांमध्ये नैराश्य असते. या गोष्टी पटकन समजत नाहीत. लहान मुलांची आयक्यू टेस्ट केली जाते. मात्र अधिक डिप्रेशनमध्ये आल्यानंतर त्यांना औषधोपचार हा महत्वाचा असतो.
-डॉ. दिक्षा रोहील्ला, मनोसोपचार तज्ञ

एकदम कोणीच आत्महत्या करत नाही. त्यासाठी एक- दोन वेळा प्रयत्न केला जातो. त्यामुळे केंद्रात आलेले रुग्ण हे आत्महत्येचा असफल प्रयत्न केलेले असतात. त्यांच्याशी प्रथम संवाद साधला जातो. लगेच तो काहीच सांगत नाही. मात्र त्याला आधार दिल्यानंतर हळूहळू सांगायला सुरुवात करतो. त्याची कौटुंबिक स्थिती जाणून घेतली जाते. त्याच्याशी संवाद साधून त्याला समुपदेशन केले जाते. नकारात्मक विचार त्याच्या मनातून काढले जातात.
-डॉ. जिनी पटनी, मानसशास्त्रज्ञ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -