घरमुंबईरेल्वे मार्गाची डेड लाईन हुकणार

रेल्वे मार्गाची डेड लाईन हुकणार

Subscribe

बहुप्रतिक्षित ठाणे-दिवा पाचवा व सहावा मार्ग पूर्ण करण्यासाठी मार्चची डेडलाईन होती. नऊ किलोमीटर असलेल्या मार्गामध्ये अनेक अडचणी असल्याने हे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ठाणे-दिवा पाच व सहाव्या मार्गाची डेडलाईन हुकणार आहे.

ठाणे-दिवा दरम्यानच्या पाचव्या-सहाव्या रेल्वे मार्गाचे काम ११ वर्षांपासून सुरु आहेत. मात्र मार्गावर असलेल्या खारफुटीमुळे हे काम रखडले आहे. दिवा स्थानकाजवळ सीएसएमटीच्या दिशेने लिव्हर क्रॉसिंगजवळ नवीन मार्ग टाकण्यासाठी जागेची आवश्यकता आहे. त्यानंतर मुंब्रा स्थानकाजवळ रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. कळवा ते ठाणे दरम्यान मोठा पूल बांधण्यात आलेला आहे. परंतु त्यातील भिंत आणि लेव्हलिंगची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे या मार्गाला पुन्हा विलंब होण्याची शक्यता आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळातर्फे हे काम करण्यात येत आहे. मात्र कामात येत असलेल्या अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याने विलंब होत असल्याचे एमआरव्हीसीच्या अधिकार्‍यांकडून सांगण्यात येत आहे. रेल्वे मार्गालगतच्या झोपडपट्टीतील नागरिकांच्या पुनर्वसनाचा मुद्दा हे विलंबामागील प्रमुख कारण असले तरी चालू वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे एमआरव्हीसीच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

- Advertisement -

ठाणे ते दिवा पाचव्या-सहाव्या रेल्वे मार्गाला २००८ मध्ये मंजुरी मिळाली होती. एमयूटीपी-२ अंतर्गत हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. कुर्ला ते ठाणे आणि दिवा ते कल्याण दरम्यान पाचवा-सहावा मार्ग कार्यरत आहे. ठाणे ते दिवा दरम्यान ५-६ वा रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाल्यास उपनगरीय रेल्वे आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक वेगळ्या मार्गावरून होणे सोईचे होणार आहे. प्रकल्पातील मुंब्राजवळ दीड किलोमीटरचा उन्नत, रुळासह अन्य तांत्रिक कामे पूर्ण होण्यासाठी आणखी काही कालावधी लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -