घरमुंबईMumbai Rains :वांद्रे येथे रिक्षावर कोसळले झाड

Mumbai Rains :वांद्रे येथे रिक्षावर कोसळले झाड

Subscribe

वांद्रे येथील पाली हिल येथे रिक्षावर अचानक रिक्षावर झाड कोसळल्याची घटना घडली असून या घटनेमध्ये रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.

मुलुंडमध्ये चालत्या रिक्षावर झाडाची फांदी पडल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा एकदा वांद्रे येथे रिक्षावर झाड कोसळल्याची घटना घडली आहे. वांद्रे पश्चिम येथील पाली हिल येथे रिक्षावर अचानक सुसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामध्ये रिक्षावर झाड कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालूी असली तरी देखील रिक्षाचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.

नेमके काय घडले आहे?

वांद्रे येथील पाली हिल परिसरात दुपारी १ वाजण्याच्या सुमारास रिक्षावर झाड पडल्याची घटना घडली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मात्र, रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.

- Advertisement -

मुंबईतमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईमध्ये परळ, दादर, माहिम, मुलुंड, कल्याण, डोंबिवली याठिकाणी पावसाने दोन दिवसांपासून हजेरी लावली आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह हा पावसाचे मुंबईत आगमन झाले आहे. तसेच गुजरातमध्ये येणाऱ्या वायूचक्रीवादळामुळे अनेक ठिकाणच्या समुद्रकिनाऱ्यावर सुरक्षिततेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मासेमारी करणाऱ्या मच्छीमाऱ्यांना देखील समुद्रात न जाण्याचे आवाहन केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -