घरमुंबईवीस लाख लिटर पाण्याच्या टाकीचा खड्डा डासांसाठी

वीस लाख लिटर पाण्याच्या टाकीचा खड्डा डासांसाठी

Subscribe

रहिवासी पाण्याच्या प्रतिक्षेत

मुंब्रा चांदनगर परिसरात 20 लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारण्याचा प्रस्ताव ठाणे महानगर पालिकेने आखला होता. यासाठी सुमय्या हॉलच्या जवळील एहसान मंझिल ही इमारत पडून तिथे खड्डा करण्यात आला. मात्र अद्यापही या कामाला गती मिळाली नसल्याने खोदलेला खड्डा तलाव होऊन त्याठिकाणी मच्छर आणि किड्यांची पैदास होत आहे. त्यामुळे हा वीस लाख लिटर पाण्यासाठीचा खड्डा डासांच्या सोयीसाठी की नागरिकांना पाणी पुरवण्यासाठी खोदण्यात आला होता? असा प्रश्न विचारला जात आहे.

या खड्ड्यातील सांडपाण्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत ठामपाच्या संबंधित अधिकारी कोणतीही माहीत देत नसल्याने रहिवाशांमध्ये संताप आहे. मुंब्रा परिसरातील चांदनगर सुमय्या हॉलच्या जवळ असलेली एहसान मंजिल ही इमारत धोकादायक असल्याचे सांगून पालिका प्रशासनाने ती पाडली. या इमारतीच्या जागेवर मुंब्रा परिसरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी पालिकेकडून 20 लाख लिटर क्षमतेच्या टाकीचे काम सुरू केले. या पाण्याच्या टाकीसाठी खोदलेल्या खड्ड्यात सांडपाणी साचले आहे. त्यामुळे या भागात डासांमुळे होणार्‍या आजार वाढण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

या परिसरातील एहसान मंझिल इमारतीत 3 प्लॅट आणि 15 दुकाने होती. पाण्याच्या टाकीसाठी इमारत तोडल्यानंतर विस्थापितांचे अद्याप कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात आलेले नाही. तर दुकानदारांच्या पुनर्वसनाबाबतही प्रशासन काही उत्तर देत नाही. एहसान मंझिल मधील 33 रहिवाशांचे पुनर्वसन शिमलापार्क बीएसयुपी आणि वर्तकनगर येथे करण्यात आले. मात्र इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या 14 दुकानदारांचे पुनर्वसनाचा करण्यात आलेले नसल्याचे ते दुकानदार सांगत आहेत. दुसरीकडे ठामपाच्या 20 लाख लिटर पाण्याच्या टाकीचे काय झाले, त्या इमारतीत राहणारे विस्थापित आणि दुकानदारांचे काय ? हे काम कधी पूर्ण होणार? असे प्रश्न मुंब्रातील रहिवाशांनी विचारले आहेत.

मी येण्यापूर्वीच इमारत तोडलेली होती. तसेच येथील काम थांबवण्यात आले. परिसरातील एमएम व्हॅली येथे दुसरे काम सुरु आहे. त्यामुळे या कामाकडे दुर्लक्ष होत आहे. रहिवाशांच्या आणि दुकानदारांच्या पुनर्वसनासाठी गीते साहेबांशी संपर्क करा.
– शशिकांत साळुंखे, उपअभियंता., पाणीपुरवठा विभाग, ठामपा

- Advertisement -

दोस्ती आणि शिमला पार्कमध्ये जे त्यावेळी आले त्यांचे पुनर्वसन झाले आहे. हे काम चार वर्षापूर्वीच झाले. त्यामुळे आता कसे पुनर्वसन राहिले आहे? ज्यावेळी पुनर्वसन झाले त्यावेळी काही जण आले नाहीत. ते गावाल राहिले, कोणाकोणाची वाट बघणार? -धनंजय गोसावी, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग ठामपा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -