घरमुंबईमानखुर्द पीएमजीपी नाल्यांवरील पुलांचे पुनर्बांधकाम लवकरच

मानखुर्द पीएमजीपी नाल्यांवरील पुलांचे पुनर्बांधकाम लवकरच

Subscribe

मानखुर्द येथील पीएमजीपी कॉलनीमधील नाल्यांवर दोन ठिकाणी पुलांचे पुनर्बांधकाम करण्यात येणार आहे.

मानखुर्द येथील पीएमजीपी कॉलनीमधील नाल्यांवर दोन ठिकाणी पुलांचे पुनर्बांधकाम करण्यात येणार आहे. सध्याच्या पुलांचे बांधकाम पाडून त्याठिकाणी पुलांची उभारणी केली जात आहे. यासाठी कंत्राटदारांची निवड करण्यात आली असून आचारसंहितेमुळे मंजुरीच्या लाल फायलीत अडलेल्या या प्रस्तावांना आता मंजुरीचा मार्ग मोकळा होताच प्रत्यक्ष कामांना सुरुवात होणार आहे.

एम-पूर्व विभागातील मानखुर्द पी.एम.जी.पी नाल्यावरील इंदिरा नगर मंडळा रोडवरील पुलाचे बांधकाम पाडून विस्तारीत पुलाचे बांधकाम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १२.५० मीटर लांबीच्या या विस्तारीत पुलाची रुंदी ही १४ मीटर असणार आहे. यासाठी लँडमार्क कार्पोरेशन या कंपनीची निवड करण्यात आली असून त्यांना ४.१२ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात येत आहे. तर येथीलच पी.एम.जी.पी नाल्यावरील ९० फूट डि.पी रोडवरीलही पूलाचे बांधकाम पाडून त्यावर विस्तारीत पुलाचे बांधकाम करण्यात येणार आहे. २८ मीटर लांब आणि ९ मीटर रुंद असलेल्या या पुलाच्या बांधकामासाठी ४.२८ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून यासाठी लँडमार्क कार्पोरेशन याच कंपनीची निवड करण्यात आली आहे.
दोन्ही पुलांच्या बांधकामांसाठी कंत्राटदारांची निवड झाल्यानंतर स्थायी समितीच्या सभेत ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. परंतु, विधानसभा निवडणूक आचारसंहितेमुळे हे प्रस्ताव प्रशासनाने मागे घेतले होते. पण आचारसंहिता संपुष्ठात आल्याने पुन्हा हे प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीला पाठवण्यात येणार असून समितीच्या मान्यनेनंतर या पुलांच्या बांधकामाला सुरुवात होईल,असे पूल विभागाच्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -