घरमुंबईडोंबिवलीत दरोडेखोर आणि पोलिसांत धुमश्चक्री; दोन दरोडेखोर गजाआड

डोंबिवलीत दरोडेखोर आणि पोलिसांत धुमश्चक्री; दोन दरोडेखोर गजाआड

Subscribe

डोंबिवलीत दरोडेखोर आणि पोलिसांत धुमश्चक्री झाली असून झारखंडमधील दोन दरोडेखोरांना अटक करण्यात आली आहे.

कल्याण युनीटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांना दरोडेखोरांची टोळी ही डोंबिवलीच्या मानपाडा रोडला असलेल्या सांगाव येथील मोबाईलच्या दुकानावर दरोडा टाकण्यासाठी येणार असल्याची खबर मिळाली होती. या मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष शेवाळे, फौजदार निलेश पाटील, नितीन मुदगुण आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी सापळा रचला होता. तासाभराच्या कालावधीनंतर ६ दरोडेखोर त्याठिकाणी आले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, चार जणांनी अंधाराचा फायदा घेत डोंबिवली एमआयडीसीच्या दिशेने पळ काढला. मात्र, त्यातील दोन दरोडेखोरांच्या थरारक पाठलाग करून पोलिसांनी मुसक्या आवळल्या. आहेत. आलम मंटू शेख (४२) तर मंजूर मुनीफ शेख (३९) यांना पोलिसांनी अटक केली आहे

नेमके काय घडले?

डोंबिवलीत दरोडा घालणारे आरोपी हे झारखंड येथे राहणारे असून या आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून या आरोपींकडे एक लोखंडी कटावणी आणि इतर दरोडा टाकण्याचे साहित्य आढळले आहे. या दोघांनाही पोलीसी हिसका दाखविताच त्यांनी अनेक ठिकाणी केलेल्या गुन्हयांची कबुली दिली. ही सहा जणांची टोळी असून यातील आलम मंटू शेख हा प्लॅनर आणि एक खतरनाक दरोडेखोर आहे. त्याच्यावर झारखंड, तामिळनाडू आणि महाराष्ट्रात ठिकठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच त्याच्यावर पूर्वी २०१७ मध्ये ठाण्याच्या नौपाडा पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली होती. सद्या हा दरोडेखोर जामिनावर बाहेर आला असून तरीही त्याने अनेक गुन्हे केले आहेत. शहरातील आलिशान मोबाईलच्या दुकानांना रात्रीच्या वेळेस भिंतीला भगदाड पाडून दरोडा टाकणाऱ्या झारखंडमधील दरोडेखोरांच्या मुसक्या क्राईम ब्रँचच्या कल्याण युनीटने आवळल्याने व्यापारी वर्गात समाधान व्यक्त होत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – नाशकात बिहारराज; दरोडेखोरांच्या गोळीबारात एका कर्मचाऱ्याचा मृ्त्यू


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -