घरमुंबईशहापूर तालुक्यात पाच वर्षांत वाढले 14 हजार मतदार

शहापूर तालुक्यात पाच वर्षांत वाढले 14 हजार मतदार

Subscribe

शहापूर तालुक्यातील मतदार यादीमध्ये या वर्षी गेल्या पाच वर्षांच्या मतदार यादीचा विचार करता तब्बल 14 हजार 697 मतदारांची वाढ झाली असून, येत्या लोकसभा व खासकरून विधानसभेसाठी हीच मते निर्णायक ठरणार आहेत.तालुक्यातील 2014 च्या मतदार यादीचा विचार करता यामध्ये 1 लाख 20 हजार 185 पुरुष तर 1लाख 10 हजार 680 महिला असे 2 लाख 30 हजार 865 मतदार होते, तर 2019 च्या मतदार यादीचा विचार केल्यास ती 1 लाख 28 हजार 381 पुरुष, 1 लाख 15 हजार 673 स्त्रीया मतदार झाल्या आहेत. ही संख्या 2 लाख 44 हजार 54 इतकी झाली असून, यामध्ये मयत 925 दुबार नाव नोंदणी 107,स्थलांतरित 473 गायब 03 अशी 1हजार 503 मतदार नावे वगळली असल्याची माहिती निवडणूक शाखेकडून प्राप्त झाली आहे. म्हणजेच 2014 च्या मतदार यादीचा विचार केल्यास 14 हजार 697 अधिकची नवे पाच वर्षांत नोंदण्यात आली आहेत. या नवीन नोंदणी झालेल्या मतदारांचा येत्या लोकसभा व विधानसभा निवडनिकीवर परिणाम तर होणार आहेच, परंतु सर्वात मोठा परिणाम होणार आहे तो विधानसभा निवडणुकीत. त्यामुळे नोंदलेली ही मते निर्णायक ठरणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -