घरमुंबईग्रामपंचायतींसाठी मतदान सुरु, १४ हजार २३४ ग्रामपंचायती निवडणूकीच्या रिंगणात

ग्रामपंचायतींसाठी मतदान सुरु, १४ हजार २३४ ग्रामपंचायती निवडणूकीच्या रिंगणात

Subscribe

१५ हजारहून अधिक उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात

कोरोना संकटानंतर राज्यात प्रथमच ग्रामपंचायत निडणुकीचा धुराळा उडणार आहे. राज्यात बुधवारी १४ जानेवारीला ग्रामपंचाय निवडणूकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस होता. आज महाराष्ट्रात एकूण ३४ जिल्ह्यांतील १४ हजार २३४ ग्रामपंचायतीसाठी निवडणुका पार पडत आहेत. या निवडणुकांसाठी मतादानाची प्रक्रिया सकाळी ७.३० वाजता सुरु झाला आहे. तर संध्याकाळी ५.३० वाजता मतदान प्रक्रिया बंद करण्यात येईल. ग्रामपंचायतींवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सर्व राजकीय पक्ष आणि राजकीय नेत्यांनी आपली ताकद पणाला लावली आहे. मतमोजणी १८ जानेवारी २०२१ रोजी करण्यात येणार आहे.

नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच गावगाड्यात ग्रामपंचायत निवडणुकींची रणधुमाळी पाहायला मिळाली. राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच ग्रामपंचायत निवडणुक घेण्यात येत आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीत राजकीय पक्षाचा समावेश असला तरी यामध्ये राजकीय पक्षाच्या चिन्हाचा वापर होत नाही.

- Advertisement -

ग्रामपंचायत निवडणूकीत वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी दिग्गज आणि वरिष्ठ नेत्यांनीही आपली ताकद पणाला लावली आहे. त्यामुळे मतदारराजाचे मतं कोणाच्या पारड्यात पडतंय हे लवकरच समोर येणार आहे. हि निवडणुक गावपातळीवर असली तरी राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची आहे. विरोधी पक्ष भाजप सर्व ताकदीनिशी मैदानात उतरला आहे. राज्यात आज १४ हजार २३४ ग्रामपंचायतींसाठी मतदान. सकाळी सात वाजल्यापासून मतदान सुरू झाले आहे. अनेक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मतदान करण्यात आले आहे. नागरिकांनी मोठ्या उत्साहात मतदान प्रक्रियेत भाग घेतल्याचे दिसून येत आहे.

मुंबई, पुण्यातील मतदार मतदान करण्यासाठी दाखल झाले आहेत. अनेक वर्षांनंतर राळेगणसिद्धी आणि हिवरे बाजार या आदर्श गावात ग्रामपंचायत निवडणुक पार पडत आहे. त्यामुळे अवघ्या राज्याचं लक्ष तेथील निवडणुकीच्या मतदानावर लागलं आहे. राज्यात आज १,२४८१९ जागांसाठी मतादानाची प्रक्रिया पार पडत आहे. त्यामुळे २,५०,००० अधिक उमेदवारांचे भवितव्य इव्हीएम मशिनवर आधारित आहे.

- Advertisement -

मतदान केंद्रांवर एक दिवसांपूर्वीच जागा व साहित्य सॅनिटाईज करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर प्रवेश करताना थर्मल स्कॅनिंग करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक मतदाराच्या शरीराचे तापमान विहित निकषापेक्षा जास्त असल्यास पुन्हा दुसऱ्यांदा तापमान घेतले जाईल. अधिक तापमान आढळल्यास संबंधित मतदारास टोकन दिले जाईल आणि त्याला मतदान संपण्याच्या अर्धा तास आधी बोलवण्यात येईल. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर सोशल डिस्टंन्सिंगसह इतर नियमांचे कडक पालन करण्यात येणार आहे. तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचनादेखील देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -