घरमुंबईसरकार आता मृतांना पाच लाख देणार, पण दुर्घटना कशा रोखणार? - वारिस...

सरकार आता मृतांना पाच लाख देणार, पण दुर्घटना कशा रोखणार? – वारिस पठाण

Subscribe

सरकार आता मृतांना पाच लाख देणार, पण दुर्घटना कशा रोखणार? असा प्रश्न एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी उपस्थित केला आहे.

डोंगरी परिसरात कौसरबाग इमारत कोसळल्यानंतर एमआयअमचे आमदार वारिस पठाण यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. मुंबईत वारंवार अशा दुर्घटना घडत आहेत. मात्र, यावर सरकार कोणत्याही प्रकारचे उपायोजना करत नसल्याचा आरोप पठाण यांनी केला आहे. या दुर्घटनेनंतर मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बाधित नागरिकांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये देणार आणि विषय सोडून देणार, असे वारिस पठाण म्हणाले आहेत. या दुर्घटना रोखण्यासाठी सरकार नेमके काय उपाययोजना करणार आहेत? असा प्रश्न देखील वारिस पठाण यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा – Breaking : मुंबईतील डोंगरीत चार मजली इमारत कोसळली

- Advertisement -

नेमकं काय म्हणाले वारिस पठाण?

मुंबईच्या डोंगरी परिसरात कौसरबाग परिसरात चार मजली इमारत कोसळली आहे. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली ४० ते ५० जण अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहे. याशिवाय प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे ही दुर्घटना घडल्याचे पठाण म्हणाले आहेत. कौसरबाग इमारत ही फार जुनी इमारत आहे. याशिवाय परिसरातील अनेक इमारती जुन्या आहेत. या इमारतीचे पुनर्वसन न झाल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे त्यांनी सांगितले. सरकाराला वेळोवेळी यासंदर्भात माहिती दिली होती. मात्र, सरकारकडून कुठलेही पाऊल न उचलले गेल्याचे वारिस पठाण म्हणाले आहेत.

हेही वाचा – मुंबईतील डोंगरीत इमारत कोसळली

- Advertisement -

‘पुनर्वसनासाठी सरकारकडून फंडींग मिळत नाही’

पुनर्वसनासाठी सरकारकडून पुरेसा फंड मिळत नाही, असे वारिस पठाण म्हणाले आहेत. सराकरला याबाबत अनेकदा सुचना आपण दिल्या असल्याचे पठाण म्हणाले आहेत. मात्र, सरकारकडून कोणत्याही प्रकारची हालचाल झाली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.


हेही वाचा – DongriBuildingCollabs : ‘या घटनांना सरकारचा नाकर्तेपणा जबाबदार’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -