घरमुंबईडोंबिवली रेल्वे पुलाचे काम तातडीने न केल्यास आंदोलनाचा इशारा

डोंबिवली रेल्वे पुलाचे काम तातडीने न केल्यास आंदोलनाचा इशारा

Subscribe

कल्याण दिशेकडील धोकादायक पुलाची रखडलेली बांधणी तातडीने सुरू करावी, अन्यथा 'भिक मांगो आंदोलन' करण्यात येईल, असा इशारा डोंबिवलीतील सामाजिक संस्थांकडून रेल्वे प्रशासनाला देण्यात आला आहे.

कल्याण दिशेकडील धोकादायक पुलाची रखडलेली बांधणी तातडीने सुरू करावी, अन्यथा ‘भिक मांगो आंदोलन’ करण्यात येईल, असा इशारा डोंबिवलीतील सामाजिक संस्थांकडून रेल्वे प्रशासनाला देण्यात आला आहे. पुलाची धोकादायक परिस्थिती पाहता हा पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे इतर दोन पुलांवर प्रवाशांचे लोंढे वाढत आहेत. यामुळे परेल सारख्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होवू नये आणि पुलाच्या बांधणीचे काम तातडीने सुरू करावे यासाठी शिननलिनी प्रतिष्ठान आणि जनहित प्रतिष्ठानतर्फे रेल्वे प्रबंधकांना निवेदन देण्यात आले.

रेल्वे अधिकाऱ्यांनी दिले आश्वासन

यावेळी शिवनलिनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिरूद्ध कुलकर्णी, जनहित प्रतिष्ठानचे महेश काळे, जितेंद्र अमोणकर, दत्ता वाठोरे, विनोद गिरी, अभय दुबे, ध्रु मोहता, नविनभाई यांनी रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा केली . सदरचे काम हे इंजिनिअरिंग विभागाचे असून सदर कामासाठी वाहतुक पुर्णपणे थांबवावी लागणार आहे, यासाठी नियोजन करण्यात येत आहे . याबाबत तोडगा काढण्यात येईल. ४ ते ५ महिन्यात सदरचे काम सुरू करण्यात येईल असे आश्वासन रेल्वे अधिकाऱ्यांनी दिल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – वांद्रे भाभा हॉस्पिटल इमारतीचा प्रस्ताव फेटाळला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -