घरमुंबईक्रिकेट स्पर्धांच्या पोलीस बंदोबस्ताचे २१ कोटी रुपये कधी वसूल करणार?

क्रिकेट स्पर्धांच्या पोलीस बंदोबस्ताचे २१ कोटी रुपये कधी वसूल करणार?

Subscribe

गेल्या ७ वर्षात क्रिकेट स्पर्धेकरता पुरवण्यात आलेल्या पोलीस बंदोबस्ताचे तब्बल २१.३४ कोटी रुपये आजपर्यंत मुंबई पोलिसांना मिळाले नसल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दिली आहे.

मुंबई पोलीस दलातील हजारो पोलीस क्रिकेट वर्ल्ड कपच्या बंदोबस्तासाठी जुंपले जात असून त्या बंदोबस्ताचे शुल्क देण्यात मुंबई क्रिकेट असोसिएशन चालढकल करत आहे. मागील ७ वर्षात क्रिकेट स्पर्धेकरता पुरवण्यात आलेल्या पोलीस बंदोबस्ताचे तब्बल २१.३४ कोटी आजपर्यंत दिली नसल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई पोलिसांनी दिली आहे. विशेष म्हणजे नुकत्याच संपन्न झालेल्या क्रिकेट सामनाच्या बंदोबस्तासाठी गृह विभागाचे आदेश प्राप्त न झाल्याचा दावा करत बंदोबस्त तर पुरवला. परंतू आजमितीला कोणतेही शुल्क आकारलेले नाही.

- Advertisement -

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई पोलिसांकडे १ जानेवारी २०११ पासून संपन्न झालेल्या क्रिकेट स्पर्धेसाठी दिला गेलेला पोलीस बंदोबस्त आणि शुल्काची माहिती मागितली होती. जनमाहिती अधिकारी आणि सहायक पोलीस आयुक्त (समन्वय) दिलीप थोरात यांनी बंदोबस्त शाखेने दिलेली माहिती उपलब्ध करत कळवले की, महिला वर्ल्ड कप २०१३ चे सामने २६ जानेवारी २०१३ ते १८ फेब्रुवारी २०१३ या कालावधीत झाले आहेत. त्याचे शुल्क ६ कोटी ६६ लाख २२ हजार ०८८ होते. जे व्याजासह १० कोटी ५५ लाख ३२ हजार १९७ इतके झाले आहेत. जे आजपर्यंत दिले गेलेले नाही. २५, ३० आणि ३१ ऑक्टोबर २०१५ रोजी झालेल्या एक दिवसीय सामन्याचे शुल्क ८३ लाख ५२ हजार ०८९ इतके होते. जे व्याजासह १ कोटी १२ लाख २६ हजार १६४ इतके प्रलंबित आहे. ८ डिसेंबर २०१६ ते १२ डिसेंबर २०१६ या दरम्यान झालेल्या क्रिकेटच्या कसोटी सामन्याचे ५० लाखाचे शुल्क आता व्याजसह ५५ लाख १८ हजार ३४४ इतके बाकी आहे. २२ ऑक्टोबर २०१७ च्या एक दिवसीय सामन्याचे ६६ लाखाचे शुल्क व्याज जोडल्यानंतर ७३ लाख ९८ हजार ६४१ आणि २४ डिसेंबर २०१७ च्या टी-२० सामन्याचे शुल्क ६६ लाख हे व्याज जोडल्यानंतर ७२ लाख ७९ हजार २५० इतके झाले आहे. आयपीएल २०१७ मध्ये ९, १२, १६, २२ आणू २४ एप्रिल २०१७ आणि ११ तसेच १६ मे २०१७ मध्ये एकूण शुल्क ४ कोटी ६२ लाख पैकी ६६ लाख इतके शुल्क अजून देणे प्रलंबित आहेत. जी व्याजसह ७६ लाख ८४ हाजर ७१० इतके देणे बाकी आहे.

वर्ल्ड टी-२० २०१६ मध्ये १०, १२, १६, १८, २० आणि ३१ मार्च २०१६ या सामन्याचे ३ कोटी ६० लाख शुल्क होते जे व्याजासह ४ कोटी ६२ लाख ४० हजार ३९९ इतके अजून बाकी आहेत. आयपीएल २०१८ मध्ये ७, १४, १७, २४ एप्रिल तसेच ६, १३, १६, २२ आणि २७ मे २०१८ चे एकूण शुल्क ४ कोटी ९० लाख पैकी १ कोटी ४० लाख इतके बाकी असून व्याजासह १ कोटी ४८ लाख ८६ हजार ६६७ इतकी रक्कम शिल्लक आहे. २९ ऑक्टोबर २०१८ रोजी झालेल्या एक दिवसीय सामन्याचे ७५ लाख रुपये हे व्याजसह ७६ लाख ७८ हजार १२५ इतकी रक्कम द्यावयाची आहे.

- Advertisement -

शुल्काबाबत गृह विभाग मौन!

आयपीएल २०१९ मध्ये २४ मार्च ३, १०, १३ आणि १५ एप्रिल तसेच २ आणि ५ मे २०१९ जे सामने झाले होते त्या सामन्याचे बंदोबस्त शुल्काबाबत मुंबई पोलीस सद्या द्विधा मनस्थितीत आहेत. मुंबई पोलिसांनी अजीब दावा केला आहे की, क्रिकेट बंदोबस्त शुल्काबाबत शासन आदेश क्रमांक ३१ मार्च २०१९ पर्यंत असून एप्रिल २०१९ पासून बंदोबस्त शुल्काचे आदेश गृहविभाग, मंत्रालय यांसकडून आदेश निर्गमित झाल्यानंतर आयोजकाला बंदोबस्त शुल्क पोलीस उप आयुक्त, सशस्त्र पोलीस या कार्यालयास भरणा करण्याबाबत कळवण्यास येईल. मुंबई पोलिसांनी अजब दावा केला आहे की, गृह विभागाचे आदेश ३१ मार्च २०१९ पर्यंत असून नवीन आदेश प्राप्त न झाल्यामुळे सद्या झालेल्या सामन्याचे शुल्क आकारलेले नाही. शासन निर्णय आल्यानंतर संबंधितांना शुल्क कळवण्यात येईल.

अनिल गलगली यांच्या मते

पोलीस बंदोबस्ताच्या बळावर अफाट नफा कमविणाऱ्या मुंबई क्रिकेट एसोसिएशनने बंदोबस्त शुल्क ताबडतोब देणे आवश्यक होते. सशस्त्र दलाच्या निष्काळजीपणामुळे शुल्क वसूल केले नसून पोलीस आयुक्तांनी जबाबदार अधिकारी वर्गावर नियमाप्रमाणे कार्यवाही करत अशा सामन्यांचे शुल्क सामना संपताच वसूल करावे किंवा क्रिकेट स्पर्धा आयोजकांकडून आधीच शुल्क वसूल करावे. जेणेकरुन पोलिसांना बंदोबस्ताचे शुल्क वसूलीचा मनस्ताप सहन करावा लागणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -