घरमुंबईCorona: कस्तुरबा रुग्णालयात कामगारांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन

Corona: कस्तुरबा रुग्णालयात कामगारांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन

Subscribe

कस्तुरबा रुग्णालयातील सर्व संवर्गातील चतुर्थश्रेणी कामगार, कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या, अडचणी तसेच प्रलंबित प्रश्नांबाबत आज, २८ मे २००२ रोजी सकाळी ७ वाजल्यापासून प्रशासनाच्या विरोधात स्वयंस्फूर्तीने आंदोलन केले. यामध्ये प्रामुख्याने खालील मुद्द्यावर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. यावेळी कस्तुरबा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ चंद्रकांत पवार, प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. बोरकर, प्रशासकीय अधिकारी सुजाता गवंडी तसेच म्युनिसिपल मजदुर युनियन, मुंबईचे संघटक मंगेश पवार, अनंत जाधव, परिनिता तांबे, उषा जगताप आदी कर्मचारी प्रतिनिधी उपस्थित होते.

कोव्हिड-१९ मध्ये काम करणाऱ्या सर्व संवर्गातील चतुर्थश्रेणी कामगार आणि मुंबई बाहेरून येणाऱ्या सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांसाठी रहाण्याची व्यवस्था हॉटेल्स, लॉज तसेच रिक्त सेवानिवासास्थाने पीएपी रूममध्ये करून त्यांना चहा, नाष्टा, जेवण आदी व्यवस्था करण्यात यावी. वॉर्ड नंबर १३ येथे महिलांची व्यवस्था करण्यात आलेली असून काही कामगार विभागात रहात आहेत. अन्य कामगार, कर्मचारी यांची रहाण्याची व्यवस्था लवकरच करण्यात येईल, तसेच सेवाभावी संस्थेमार्फत जेवण दिले जात आहे. कोरोना रुग्णांची सेवा देत असताना कोणत्याही कर्मचाऱ्याला कोरोना प्रादुर्भाव झाल्यास त्यांना स्वतंत्र कक्षामध्ये दाखल करण्यात यावे. स्वतंत्र कक्षामध्ये दाखल करून डॉक्टर्स यांच्या सल्यानुसार योग्य उपचार देण्यात येतील.

- Advertisement -

चतुर्थश्रेणी कामगारांची ४० टक्के पदे रिक्त असल्यामुळे तसेच १९ चतुर्थश्रेणी कामगार पॉझिटिव्ह झाल्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या कामगारांवर कामाचा प्रचंड ताण येत आहे. त्यामुळे रिक्त असलेली ७१ पदे अधिक (+) रजा राखीव पदे के.ई.एम, नायर, सायन, जी. टी.बी. रुग्णालयाच्या धर्तीवर कामगारांच्या मुलांमधून (रोजंदारी) किमान वेतनावर भरण्यात यावीत. याबाबत प्रस्ताव सादर केला जाईल आणि ही पदे किमान वेतनावर भरण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. तसेच डॉ. पद्मजा केसकर, कार्यकारी आरोग्य अधिकारी यांच्याशी बोलून ही पदे लवकर भरण्यासाठी मार्गदर्शन घेतले जाईल, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.

काय आहेत मागण्या 

  • ५५ वर्षावरील सर्व संवर्गातील कामगार, कर्मचाऱ्यांना कोव्हिड-१९ मध्ये काम देण्यात येऊ नये आणि अपंग कर्मचाऱ्यांना घरी रहाण्याची मुभा देण्याबाबत प्रसृत परिपत्रकाची अंमलबजावणी करण्यात यावी. यावर ५५ वर्षावरील सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांना कोव्हिड-१९ मध्ये काम देण्यात येणार नाही, तसेच अपंग कर्मचारी यांनी कामावर येऊ नयेत अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.
  • कोव्हिड-१९ मध्ये काम करणाऱ्या सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांना संसर्ग होऊ नये म्हणून ५ दिवस काम आणि २ सुट्टी देण्यात यावी. यावर त्वरित समयलेखक कार्यालयातील कर्मचारी प्रकाश पवार यांना ५ दिवस काम आणि २ सुट्टी देण्यात यावी, असे आदेश देण्यात आले.
  • ओ. टी. गणवेश कोव्हिड-१९ मध्ये काम करणाऱ्या सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांना देण्यात यावा. यावर ओ. टी. गणवेश देण्याचे मान्य करण्यात येईल.

हेही वाचा –

कोरोनामुक्ती करता १०० देशात केले जाणार ‘यज्ञ’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -