जरीन खानला वेश्या बोलणं पडलं महागात

अभिनेत्री जरीन खानला वेश्या बोलल्यामुळे तिच्या माजी- व्यवस्थापकाविरोधात खार पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. मागील अनेक दिवसांपासून या दोघांमध्ये वाद सुरु असल्याने जरीनने केलीी तक्रार.

Mumbai
Zarine-khan
अभिनेक्षी जरीन खान

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्यासोबत आपल्या करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री जरीन खान हीने खार पोलीस ठाण्यात नुकतीच तक्रार नोंदवली आहे. आपली माजी व्यवस्थापक अंजली अथ हिच्या विरोधात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पैशावरील वादामुळे तिने जरीन खानला हे अपशब्द वापरले असल्याचे सांगितले आहे. गुरुवारी संध्याकाळी ५०९ कलमाअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. झरीन खान ने आपल्या करिअरची सुरुवात वीर या चित्रपटातून केली होती. यानंतर हेटस्टोरी, अक्सर २, वजह तुम हो, हाऊसफुल २ आणि १९२१ अशा अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केले.

 

View this post on Instagram

 

♠️

A post shared by Zareen Khan 🦄🌈✨👼🏻 (@zareenkhan) on

कोण आहे अंजली अथ

अंजली अथ ही बॉलिवूडमध्ये कलाकारांच्या व्यवस्थापक (मॅनेजर) म्हणून काम करते. तिने काही काळ जरीन खान साठीही काम केले. मागील काही दिवसांपासून अंजलीने काम सोडले होते. जरीनने मागील दोन तीन महिन्यांचा पगार थकवला असल्याचा आरोप अंजलीने केला होता. मागील काही दिवसांपासून दोघांमध्ये पैशावरुन वाद सुरु होता. या वादातून तिन जरीनला अपशब्द वापरले. अखेर जरीनने खार पोलिसांकडे तक्रार दाखल केली. मात्र अंजलीने आरोप फेटाळले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anjali Athaa (@anjaliathaa) on

“माझ्या अशीलावर अपशब्द वापरल्या आले आहेत. यामुळे समाजात त्यांची प्रतिमा मलिन झाली असल्यामुळे खार पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. महिलेला अपशब्द वापरल्यामुळे या प्रकरणी ५०९ कलमाअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.” – रिजवान सिद्दीकी, जरीन खानचे वकील

दरम्यान या सर्व प्रकारचा मला आणि माझ्या कुटुंबीयांना मानसिक त्रास झाला असल्याचे झरीन खानने सांगितले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here