घरफोटोगॅलरीठाण्यात १५ मृत पक्षी सापडले, बर्ड फ्ल्यूची भीती

ठाण्यात १५ मृत पक्षी सापडले, बर्ड फ्ल्यूची भीती

Subscribe

पोंड हेरॉन, म्हणजे पाण बगळा जातीच्या एकूण १५ पक्षांचा मृत्यू

कोरोनाच्या नव्या स्ट्रेननंतर आता देशात बर्ड फ्लूच्या घटनांमध्ये वाढत होत आहे. जवळपास ६ राज्यांमध्ये हजारो पक्षांचा बर्ड फ्ल्यूने मृत्यू झाला. त्यातच आता महाराष्ट्रात देखील बर्ड फ्ल्यूने शिरकाव केल्याचे म्हटले जात आहे. मुंबईच्या ठाण्यात रस्त्यावर अचानक अनेक पक्षी मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. रस्त्यावर सकाळपासून पक्षी मृतावस्थेत आढळून आले आहे. या सर्व पक्ष्यांना ठाणे वनविभागाने ताब्यात घेतले आहे. या पक्षांना नेमके काय झाले याची माहिती अद्याप समोर आली नाही. परंतु, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -