मुंबईत केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकड्या दाखल

कोरोना व्हायरसने गेली दोन महिने महाराष्ट्रात थैमान घातले आहे. त्यात लॉकडाऊनमुळे आरोग्य यंत्रणेप्रमाणेच अहोरात्र आपले कर्तव्य बजावणारी पोलीस यंत्रणा देखील थकली आहे. दरम्यान, ३१ मेपर्यंत भारतात वाढलेला लॉकडाऊनचा चौथा टप्पा आणि रमजान ईद पाहता महाराष्ट्र सरकारकडून केंद्राकडे सुरक्षा दलाची अधिकची कुमक देण्याबाबत मागणी केली होती. त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सीआयएसएफ आणि सीआरपीएफ च्या तुकड्या दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. (फोटो - दिपक साळवी)

Mumbai