Photo: मराठीतील चॉकलेट बॉयने शेअर केले पहिले फोटोशूट

Mumbai

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता स्वप्नील जोशी जुन्या मालिकेमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. उत्तर रामायणात ‘कुश’ आणि श्रीकृष्ण मध्ये ‘कृष्णा’ची भूमिका करून त्यांने अनेकांची मनं जिंकली आहेत. या मालिका पुन्हा प्रसारित झाल्यामुळे स्वप्नील पुन्हा सध्या चर्चेत आला होता. अलीकडेच स्वप्नीलने काही जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांनी आपले पहिले फोटोशूट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.