घरक्रीडाऑस्ट्रेलियाची अफगाणिस्तानवर बाजी; ७ गडी राखून विजयी

ऑस्ट्रेलियाची अफगाणिस्तानवर बाजी; ७ गडी राखून विजयी

Subscribe

अफगाणिस्तानच्या संघाने ऑस्ट्रेलिया सारख्या संघाला २०८ धावांचे आव्हान दिले होते. परंतु, हे आश्वासक आव्हान ऑस्ट्रेलियाने सहज पूर्ण केले.

अफगाणिस्तानने दिलेल्या २०७ धावांचे आश्वास्क आव्हान ऑस्ट्रेलियाने लिलया पेलले. ऑस्ट्रेलियाने आपले सात गडी राखत अफगाणिस्तानवर मात केली आहे. या विजयामागे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याची भूमिका महत्त्वाची ठरली. त्याने नाबाद ८९ धावा केल्या. यासोबत सलामीवीर फिंचने देखील आक्रमक फलंदाजी केली. परंतु उंच फटका मारण्याच्या नादात तो झेलबाद झाला. त्याने ४९ चेंडूत ६६ धावा केल्या. यात ६ चौकार आणि ४ षटकार त्याने मारले. दरम्यान ख्वाजा स्वस्तात तंबूत परतला. त्यानंतर वॉर्नरने स्मीथसोबत भागिदारी करत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला.

विश्वचषक स्पर्धेचा चौथा सामना हा अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला. या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या विश्वचषक स्पर्धेत झालेल्या तीन सामन्यांच्या तुलनेने अफगाणिस्तानने चांगली कामगिरी केली. कारण शुक्रवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानचा संघ अवघ्या १०६ धावांवर बाद झाला होता. तर शनिवारी श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी आलेला श्रीलंकेचा संघ १३६ धावांवर ऑल आउट झाला. त्यामुळे या सामन्यांच्या तुलनेने अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलिया सारख्या संघासमोर २०७ धावा केला आहे. त्यामुळे या विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तानचा संघ तोडीस तोड उत्तर देणार हे निश्चित झाले आहे.

- Advertisement -

प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या अफगाणिस्तानची सुरुवात फार वाईट ठरली. सलामीवीर मोहम्मद शहझाद आणि हझरतुल्ला झझई शुन्यावर बाद झाले. त्यानंतर रेहमत शाहने हशमतुल्ला शाहिदी सोबत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र शाहिदी १८ धावा करुन बाद झाला. त्यानंतर मोहम्मद नाबी देखील ७ धावा करुन बाद झाला. त्यानंतर कर्णधार गुल्बदिन नाबी याने रेहमत सोबत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र रहमत बाद झाला. त्याने ६ चौकार मारत ४३ धावा केल्या. त्यानंतर नाबीने नझबुल्ला सोबत भागीदारी केली. परंतु, उंच फटका मारण्याच्या नादात नाबी बाद झाला. त्याने ३१ धावा केल्या. मात्र, नझबुल्लाने आपले अर्धशतक साजरी पूर्ण केले. त्यानंतर तो देखील बाद झाला. रशीद खानने ३ षटकार आणि २ चौकार मारुन सामन्यात रंगत आणली. त्यामुळे अफगाणिस्तानच्या धावा देखील २०० आकड्याच्या जवळ आल्या. परंतु, तो देखील एलब्यूडबल्यू बाद झाला. सरते शेवटी ३८.२ षटकांत अफगाणिस्तान संघ ऑल आउट झाला. त्याने २०८ धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाला दिले.

Chetan Patilhttps://www.mymahanagar.com/author/chetan/
writer, poet, journalist, copy writer, theater artist
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -