Asian Games 2018 : भारतीय कबड्डी संघ पराभूत

एशियाड गेम्स २०१८ मध्ये भारताच्या पुरूष संघाला दक्षिण कोरियाने पराभूत केले आहे.

Mumbai
men kabaddi india team
भारतीय कबड्डी संघ

आशिया खेळ २०१८ इंडोनेशियातील जकार्ता आणि पालेबांग येथे सुरू असून भारतीय कबड्डी संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारताला दक्षिण कोरियाने पराभूत केले आहे. पहिल्या सामन्यात भारताने बांग्लादेशला ५०-२१ च्या फराकने नमवत विजय आपल्या नावे केला होता मात्र दुसऱ्या सामन्यात भारताला दक्षिण कोरियाने पराभूत केले आहे.

सामन्यात सुरूवातीला भारताने चांगली सुरूवात केली खरी मात्र नंतर दक्षिण कोरियाने आपला खेळ उंचावत सामना २४-२३ च्या फरकाने आपल्या नावे केला आहे.