घरक्रीडाबिपीन फुटबॉल प्रशिक्षण शिबीर येत्या रविवारपासून

बिपीन फुटबॉल प्रशिक्षण शिबीर येत्या रविवारपासून

Subscribe

बिपीन फुटबॉल अकादमीच्या मोफत प्रशिक्षण शिबिराला येत्या रविवारपासून (२० ऑक्टोबर) सकाळी ८ वाजता सुरुवात होणार आहे. हे प्रशिक्षण शिबीर कर्नाटक स्पोर्टिंग असोसिएशनच्या मैदानावर पार पडेल. या प्रशिक्षण शिबिरात १६ वर्षांखालील मुला-मुलींना सहभाग नोंदवता येणार आहे. मुंबईतील आठ केंद्रांवर सराव शिबिरे सुरू होणार आहेत. यात कुलाबा, चर्चगेट, कफ परेड (बीएमसी शिबीर), वसई, उल्हासनगर, अंधेरी-विलेपार्ले, दहिसर आणि मिरा रोड या केंद्रांचा समावेश आहे.

कफ परेड येथील शिबीराला २१ ऑक्टोबरपासून सीपीआरए मैदान, कफ परेड येथे सुरू होईल. शिबिरात सहभागी होणार्‍या मुला-मुलींना बिपीन फुटबॉल अकादमीच्या प्रशिक्षकांचे मार्गदर्शन मिळणार आहे. त्यानंतर या आठ केंद्रांमध्ये डिसेंबर महिन्यात दोन दिवसांची आंतरकेंद्र स्पर्धा होईल.

- Advertisement -

आठ केंद्रांबाबत अधिक माहिती-

बीएमसी शिबीर : सीपीआरए मैदान, कफ परेड
मुख्य प्रशिक्षक : स्टीव्हन डायस,
संचालक : सालू डिसुझा (७५०६१८४९९०)

दहिसर : दहिसर स्पोर्ट्स फाऊंडेशन, दहिसर (पू.)
मुख्य प्रशिक्षक : फ्रान्सिस न्यून्स
संचालक : प्रताप गावंड (९९२००१०५२९)

- Advertisement -

उल्हासनगर : बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल
मुख्य प्रशिक्षक : मोनाप्पा मूल्या
संचालक : श्याम खरात (८०८०९०६२६२)

अंधेरी-विलेपार्ले : एमव्हीएम एज्युकेशनल कॅम्पस मैदान, अंधेरी (प.)
मुख्य प्रशिक्षक : रणजित मटकर
संचालक : सिद्धार्थ सभापती (७७३८४५०४३१)

वसई : सेंट झेवियर्स इंग्लिश मीडियम स्कूल, वसई (प.)
मुख्य प्रशिक्षक : एथेन कल्लात
संचालक : रुडॉल्फ स्कुबा (८३९०८९६८९८)

कुलाबा : बॅक गार्डन
मुख्य प्रशिक्षक : अमित भगवाने
संचालक : सुधाकर राणे (९३२२८२३०३५)

चर्चगेट : कर्नाटक स्पोर्टिंग असो. मैदान
मुख्य प्रशिक्षक : बॉस्को फर्नांडिस
संचालक : दिएगो डिसुझा (९३२४३५२५२२)

मिरा रोड : शांती नगर, सेक्टर ९
मुख्य प्रशिक्षक : थॉमस टॉबिज
संचालक : अमित मालवेकर (९८९२८०९३४५)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -