घरक्रीडामी मॅच फिक्सिंग केली होती - पाकिस्तानी क्रिकेटर

मी मॅच फिक्सिंग केली होती – पाकिस्तानी क्रिकेटर

Subscribe

क्रिकेट हा जंटलमन्सचा खेळ आहे. परंतु या खेळात अनेक मॅच फिक्सिंगची प्रकरणे उघडकीस आली आहेत. त्यामुळे या जंटलमन्सच्या खेळाला अनेकदा गालबोट लागल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामधीलच उघडकीस आलेले एक प्रकरण म्हणजे पाकिस्तानी क्रिकेटर दानिश कानेरियाचे. सहा वर्षांपूर्वी त्याच्यावर मॅच फिक्सिंगचे आरोप झाले होते. परंतु गेली सहा वर्ष फिक्सिंगचे आरोप फेटाळणाऱ्या पाकिस्तानच्या या माजी गोलंदाजाला म्हणजेच दानिश कानेरियाला अखेर उपरती सुचली आहे. कानेरियाने इंग्लंडमधील एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत फिक्सिंग केल्याचे मान्य केले आहे. कानेरियामुळे इंग्लंडमधील एसेक्स क्लबमधील त्याचा सहकारी मर्व्हेन वेस्टफिल्डला कारागृहात जावे लागले होते. कानेरियावर मॅच फिक्सिंगचे आरोप झाल्यावर कानेरियावर इंग्लिश क्रिकेटने आजीवन बंदी घातली आहे आणि ती जगभरात लागू होते. एका इंग्रजी वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार अल जजीरा चॅनेलने केलेल्या एका डॉक्युमेंटरीत कानेरियाने सांगितले की, ‘माझे नाव दानिश कानेरिया आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने माझ्यावर २०१२ मध्ये फिक्सिंगचे दोन आरोप केले होते. ते आरोप मी मान्य करतो.’ यावर कानेरिया पुढे म्हणाला की, त्यावेळी आपण केलेल्या कृत्याचा पश्चाताप होतोय. त्यामुळे माझ्यावर घातलेली आजीवन बंदी आता उठवण्यात यावी. शिवाय तो म्हणाला की, ‘मर्व्हेन, एसेक्स संघातील सहकारी, एसेक्स क्रिकेट क्लब, एसेक्सचे चाहते आणि पाकिस्तानसह जगभरातील माझे व पाकिस्तानी क्रिकेटचे चाहत्यांची माफी मागतो.

कधी केली होती फिक्सिंग

२००९ साली डरहॅम येथे खेळवण्यात आलेल्या ४० षटकांच्या काऊंटी सामन्यात कानेरियाने पहिल्याच षटकात १२ धावा दिल्या होत्या. त्याबदल्यात त्याला सट्टेबाज अनु भट्ट याने ७ हजार ८६२ डॉलर दिले होते.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -