घरक्रीडाविश्वचषकासाठी धोनी महत्वाचा-युवराज सिंग

विश्वचषकासाठी धोनी महत्वाचा-युवराज सिंग

Subscribe

भारतीय संघाला जर मे महिन्यात सुरु होणार्‍या क्रिकेट विश्वचषकात चांगली कामगिरी करायची असेल तर महेंद्रसिंग धोनी संघात असणे अत्यंत महत्वाचे आहे, असे मत भारताचा ताबडतोड फलंदाज युवराज सिंगने व्यक्त केले आहे. धोनीवर त्याच्या फॉर्ममुळे आणि त्याच्या संथ फलंदाजीमुळे बरीच टीका झाली होती. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत त्याने अप्रतिम प्रदर्शन केले. कठीण परिस्थितीत धोनीसारखा खेळाडू कर्णधार विराट कोहलीला खूप उपयोगी पडेल, असे २०११ विश्वचषकाचा सर्वोत्तम खेळाडू ठरलेला युवराज म्हणाला.

माहीला (धोनी) क्रिकेटची खूप चांगली समज आहे. यष्टीरक्षकासमोर सगळा खेळ होत असल्याने तो खेळाचा अंदाज घेऊ शकतो आणि धोनी ते काम वर्षानुवर्षे उत्तम पद्धतीने करत आहे. तो खूप उत्कृष्ट कर्णधार होता. तसेच तो नेहमी युवा खेळाडूंना आणि कर्णधार विराट कोहलीला मार्गदर्शन करत असतो. धोनी संघात असल्याचा कोहलीला खूप फायदा होईल. संघ जेव्हा दबावात असेल तेव्हा धोनी कोहलीला मार्गदर्शन करू शकेल. त्याने ऑस्ट्रेलियामध्ये खूप चांगली फलंदाजी केली. त्याला असे खेळताना पाहून खूप बरे वाटले. मला आशा आहे तो पुढेही असाच खेळत राहील, असे युवराज म्हणाला.

- Advertisement -

पंजाबचा युवा फलंदाज शुभमन गिलला न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात संधी मिळाली होती. त्याच्या भारतीय संघातील समावेशाबद्दल युवराज म्हणाला, शुभमनला भारतासाठी खेळताना पाहण्यासाठी मी खूप उत्सुक होतो. त्याने आपल्या खेळात खूप सुधारणा केली आहे. भारत अ संघाकडून चांगले प्रदर्शन केल्यानंतर त्याने स्थानिक क्रिकेटमध्येही चमकदार कामगिरी केली. त्यामुळेच त्याची भारतीय संघात निवड झाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -