घरक्रीडागेलचा यु-टर्न, निवृत्तीचा निर्णय मागे

गेलचा यु-टर्न, निवृत्तीचा निर्णय मागे

Subscribe

वेस्ट इंडिजचा तडाखेबाज सलामीवीर क्रिस गेलने काही महिन्यांपूर्वी विश्वचषक संपल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, आता त्याने हा निर्णय मागे घेतला आहे. विश्वचषकानंतर होणार्‍या भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी आणि एका कसोटी सामन्यासाठी मी उपलब्ध असणार आहे, असे बुधवारी गेलने सांगितले. मी भारताविरुद्धचा कसोटी सामना कदाचित खेळेन. त्यानंतर होणार्‍या एकदिवसीय मालिकेसाठी मी नक्कीच उपलब्ध असणार आहे. विश्वचषकानंतर मला आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये खेळायचे नाही, असे गेलने सांगितले. ३९ वर्षीय गेलने आतापर्यंत १०३ कसोटी सामने खेळले असले तरी त्याने आपला अखेरचा कसोटी सामना २०१४ मध्ये खेळला होता. त्यामुळे भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी त्याची विंडीज संघात निवड होण्याची शक्यता कमी आहे. मात्र, एकदिवसीय संघाचा तो अजूनही महत्त्वाचा भाग आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -