रिषभ पंतला वेळ द्या -गांगुली

Mumbai

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीने सध्या फॉर्मसाठी झुंजणार्‍या यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतला पाठिंबा दर्शवला आहे. पंतला मागील काही काळात क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. त्यातच त्याने यष्टिरक्षणातही चुका केल्या आहेत. मात्र, संघातून वगळणे हा पर्याय नसून त्याला वेळ दिला पाहिजे, असे गांगुलीने सांगितले.

रिषभ पंत हा उत्कृष्ट खेळाडू आहे. त्याला थोडा वेळ द्या. तो चांगली कामगिरी करेल याची मला खात्री आहे. तो हळूहळू परिपक्व होईल. त्यामुळे त्याला वेळ दिलाच पाहिजे. भारतीय संघाने बांगलादेशविरुद्धच्या दुसर्‍या टी-२० सामन्यात अप्रतिम खेळ केला, असे गांगुली म्हणाला.

पंतने कमकुवत बाजूंवर काम करावे- संगकारा

रिषभ पंतने फार गोष्टींचा विचार न करता केवळ आपल्या कमकुवत बाजूंवर काम केले पाहिजे, असे श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू कुमार संगकाराला वाटते. पंतने फार गोष्टींचा विचार करण्याची गरज नाही. त्याने केवळ कमकुवत बाजूंवर काम केले पाहिजे. त्याने कमकुवत बाजू मजबूत केल्या की, त्यानंतर त्याने योग्य योजना आखल्या पाहिजेत. त्याला फार दबाव घेण्याची गरज नाही, असे संगकारा म्हणाला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here