घरक्रीडापहिल्या टी-२० सामन्यात भारताचा ८० धावांनी पराभव!

पहिल्या टी-२० सामन्यात भारताचा ८० धावांनी पराभव!

Subscribe

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात यजमान न्यूझीलंडने भारताला विजयासाठी २२० धावांचे तगडे आव्हान दिले होते. तर धावांचा पाठलाग करताना १९.२ षटकात भारताला सर्वबाद १३९ इतकीच धावसंख्या उभारता आली.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा दारूण पराभव झाला आहे. वेलिंग्टन येथे झालेल्या सामन्यात टॉस जिंकल्यावर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेल्या भारतासमोर न्यूझीलंडने २२० धावांचे तगडे अव्हान उभे केले होते. तर धावसंख्येचा पाठलाग करताना भारताला २० षटकांमध्ये केवळ १३९ इतकीच धावसंख्या उभारता आली.

न्यूझीलंडकडून टीम सायफर्ट याने सर्वाधिक ८४ धावा केल्या, तर (कर्णधार) केन विल्यम्सन आणि कॉलिन मुनरो यांनी प्रत्येकी ३४ धावा केल्या. तर प्रथम गोलंदाजी करणाऱ्या भारताकडून हार्दिक पांड्याने २ तर कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद आणि यजुवेंद्र चहल यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

- Advertisement -

भारताकडून महेंद्रसिंग धोनीने सर्वाधिक ३९ धावा केल्या. तर विराट कोहलीच्या अनुपस्थितीत कर्णधार असलेला रोहित शर्मा केवळ एक धाव करून बाद झाला. न्यूझीलंडकडून टीम साऊथी याने सर्वाधिक ३ बळी घेतले. तर, लोकी फर्ग्युसन, ईश सोधी, मिचेल सन्टनर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -