घरक्रीडाइंडोनेशिया मास्टर्स : सिंधूला पराभवाचा धक्का

इंडोनेशिया मास्टर्स : सिंधूला पराभवाचा धक्का

Subscribe

विश्वविजेत्या पी. व्ही. सिंधूला इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. पाचव्या सीडेड सिंधूला जपानच्या सयाका ताकाहाशीने २१-१६, १६-२१, १९-२१ असे पराभूत करत स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. बिनसीडेड ताकाहाशीने पहिल्या फेरीत भारताच्याच सायना नेहवालवर मात केली होती. सिंधूने मागील वर्षी जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याची ऐतिहासिक कामगिरी केली होती. मात्र, त्यानंतरच्या स्पर्धांमध्ये तिला चांगला खेळ करता आलेला नाही. यंदाच्या वर्षातील पहिली स्पर्धा मलेशिया ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत सिंधूला पराभवाचा सामना करावा लागला होता, तर इंडोनेशिया मास्टर्समध्ये ती उप-उपांत्यपूर्व फेरीत गारद झाली.

पाचव्या सीडेड सिंधू आणि ताकाहाशीमधील सामना फारच चुरशीचा झाला. या सामन्याच्या पहिल्या गेममध्ये सिंधूने उत्तम खेळ केला आणि हा गेम २१-१६ असा जिंकला. मात्र, ताकाहाशीने दमदार पुनरागमन करत दुसरा गेम २१-१६ असा जिंकत सामन्यात १-१ अशी बरोबरी केली. तिसर्‍या आणि निर्णायक गेममध्ये दोन्ही खेळाडूंनी झुंजार खेळ केला. मात्र, अखेरच्या क्षणांत ताकाहाशीने आपला खेळ उंचावत हा गेम २१-१९ असा अवघ्या २ गुणांच्या फरकाने जिंकत स्पर्धेत आगेकूच केली.

- Advertisement -

भारताचे आव्हान संपुष्टात

सिंधूच्या पराभवामुळे भारताचे इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. किदाम्बी श्रीकांत, साई प्रणित, प्रणॉय, पारुपल्ली कश्यप, समीर आणि सौरभ वर्मा पुरुष एकेरीच्या पहिल्याच फेरीत पराभूत झाले. पुरुष दुहेरीच्या पहिल्या फेरीत भारताची आघाडीची जोडी सात्विकसाईराज रणकिरेड्डी आणि चिराग शेट्टीवर पहिल्या फेरीत दुसर्‍या सीडेड मोहम्मद एहसान आणि हेंद्रा सेतैवान यांनी २०-२२, २१-१४ अशी मात केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -