राजस्थान रॉयल्स vs किंग्स इलेव्हन पंजाब प्रीव्ह्यू 

आज आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब असा सामना रंगणार आहे. राजस्थानचा हा यंदाच्या मोसमातील दुसरा सामना असून पहिल्या सामन्यात त्यांनी चेन्नई सुपर किंग्स संघाचा पराभव केला होता. दुसरीकडे पंजाबचा हा यंदाच्या मोसमातील तिसरा सामना असून त्यांनी पहिला सामना गमावला होता, पण दुसऱ्या सामन्यात दमदार पुनरागमन करत त्यांनी आरसीबीवर मात केली. त्यामुळे दोन्ही संघांचा आत्मविश्वास सध्या उंचावलेला आहे. हा सामना शारजाह येथे होणार असून दोन्ही संघ मोठी धावसंख्या उभारण्याची शक्यता नाकारता येत नाही.