घरक्रीडाIPL Auction : हा 'मिस्ट्री स्पिनर' ठरला सर्वात महागडा खेळाडू; पंजाबने ८.४०...

IPL Auction : हा ‘मिस्ट्री स्पिनर’ ठरला सर्वात महागडा खेळाडू; पंजाबने ८.४० कोटींमध्ये केले खरेदी

Subscribe

मागील आयपीएल लिलावाप्रमाणे या लिलावातही वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटवर मोठी बोली लागली.

बाराव्या आयपीएल मोसमाआधी मंगळवारी खेळाडू लिलाव झाला. या लिलावात तामिळनाडूचा ‘मिस्ट्री स्पिनर’ वरुण चक्रवर्तीला ८.४० कोटी इतकी मोठी रक्कम देत किंग्स इलेव्हन पंजाबने खरेदी केले. तर मागील आयपीएल लिलावाप्रमाणे या लिलावातही वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटवर मोठी बोली लागली. त्यालाही ८.४० कोटी रुपयांत राजस्थान रॉयल्सने पुन्हा आपल्या संघात घेतला. तर युवराज सिंगला कोणता संघ घेणार याकडेही साऱ्यांचे लक्ष होते. त्याला पहिल्या टप्प्यात कोणीही खरेदी केले नाही. पण दुसऱ्या टप्प्यात त्याला मुंबई इंडियन्सने त्याची मूळ किंमत १ करोडमध्येच खरेदी केले.

कोण आहे वरुण चक्रवर्ती ? 

८.४० कोटी मिळालेला वरुण चक्रवर्ती हा २७ वर्षीय तामिळनाडूचा खेळाडू आहे. तो १७ वर्षांचा होईपर्यंत यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून खेळात होता. यानंतर त्याला कोणत्याही क्लबने खेळण्याची संधी न दिल्याने त्याने क्रिकेट सोडून आर्किटेक्चरच्या पदवीचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. मात्र शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने पुन्हा वेगवान गोलंदाज म्हणून क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. पण मध्यंतरी त्याला दुखापत झाली आणि त्याने फिरकीपटू होण्याचा निर्णय घेतला. यावर्षी झालेल्या तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये वरुणने अप्रतिम कामगिरी केली होती. तर त्याने यावर्षी विजय हजारे चषकाच्या ९ सामन्यांत २२ विकेट घेतल्या. त्यामुळेच लिलावात त्याच्यावर मोठी बोली लागली.

कोणी कोणाला खरेदी केले :

  • मुंबई इंडियन्स – बरिंदर स्रान (३.४० कोटी), लसिथ मलिंगा (२  कोटी), युवराज सिंग (१  कोटी), अनमोलप्रीत सिंग (८० लाख), पंकज जस्वाल (२० लाख), रसिख दार (२० लाख)
  • चेन्नई सुपरकिंग्स – मोहित शर्मा (५  कोटी), ऋतुराज गायकवाड (२० लाख)
  • दिल्ली कॅपिटल्स – कॉलिन इंग्राम (६.४०  कोटी), अक्षर पटेल (५  कोटी), हनुमा विहारी (२  कोटी), शेर्फेन रुदरफोर्ड (२  कोटी), इशांत शर्मा (१.१०  कोटी), किमो पॉल (५० लाख), अंकुश बेन्स (२० लाख), नथू सिंग (२० लाख), बंडारू अय्यप्पा (२० लाख)
  • सनरायजर्स हैदराबाद – जॉनी बेरस्टोव (२.२० कोटी), वृद्धिमान साहा (१.२० कोटी), मार्टिन गप्टिल (१ कोटी)
  • कोलकाता नाईट रायडर्स – कार्लोस ब्रेथवेट (५ कोटी), लोकी फर्ग्युसन (१.६० कोटी), जो डेनली (१ कोटी), हॅरी गर्नी (७५ लाख), निखिल नाईक (२० लाख), श्रीकांत मुंढे (२० लाख), पृथ्वी राज यारा (२० लाख), ऍन्रिच नॉर्टजे (२० लाख)
  • राजस्थान रॉयल्स – जयदेव उनाडकट (८.४० कोटी), वरुण अॅरॉन (२.४० कोटी), ओशेन थॉमस (१.१० कोटी), अॅष्टन टर्नर (५० लाख), लियम लिविंगस्टन (५० लाख), शशांक सिंग (३० लाख), रियन पराग (२० लाख), मनन वोहरा (२० लाख), शुभम रांजणे (२० लाख)
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळूर – शिवम दुबे (५ कोटी), शिमरॉन हेटमायर (४.२०  कोटी), अक्षदीप नाथ (३.६० कोटी), प्रयास बर्मन (१.५० कोटी), हिम्मत सिंग (६५ लाख), गुरकिरत सिंग (५० लाख), हेन्रिक क्लासन (५० लाख), देवदत्त पडीक्कल (२० लाख), मिलिंद कुमार (२० लाख)
  • किंग्स इलेव्हन पंजाब – वरुण चक्रवर्ती (८.४० कोटी), सॅम करन (७.२० कोटी), मोहम्मद शमी (४.८० कोटी), प्रभसिमरन सिंग (४.८० कोटी), निकोलस पुरन (४.२० कोटी), मोसेस हेन्रीक्स (१ कोटी), हर्डस विल्योन (७५ लाख), सर्फराज खान (२५ लाख), अर्शदीप सिंग (२० लाख), अग्निवेश अयाची (२० लाख), हरप्रीत ब्रार (२० लाख), मुर्गन अश्विन (२० लाख).
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -