घरक्रीडाNZ vs PAK : केन विल्यमसनचे द्विशतक; न्यूझीलंडला त्रिशतकी आघाडी 

NZ vs PAK : केन विल्यमसनचे द्विशतक; न्यूझीलंडला त्रिशतकी आघाडी 

Subscribe

विल्यमसनचे हे कसोटी क्रिकेटमधील चौथे आणि मागील तीन कसोटीतील दुसरे द्विशतक ठरले.   

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत त्याचा दमदार फॉर्म कायम राखला. या सामन्याच्या पहिल्या डावात विल्यमसनने ३६४ चेंडूत २३८ धावांची खेळी केली. हे त्याचे कसोटी क्रिकेटमधील चौथे आणि मागील तीन कसोटीतील दुसरे द्विशतक ठरले. त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध २५१ धावांची खेळी केली होती. तर पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीत त्याने १२९ धावा केल्या होत्या. दुसऱ्या कसोटीत त्याने द्विशतक झळकावल्याने न्यूझीलंडने पहिला डाव ६ बाद ६५९ धावांवर घोषित केला.

दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाची न्यूझीलंडने ३ बाद २८६ धावांवरून सुरुवात केली. कर्णधार विल्यमसन आणि हेन्री निकोल्सने अप्रतिम फलंदाजी करत चौथ्या विकेटसाठी ३५९ धावांची भागीदारी रचली. निकोल्सने १५७ धावांची खेळी केल्यावर त्याला मोहम्मद अब्बासने बाद केले. विल्यमसनने मात्र चांगली फलंदाजी सुरु ठेवत ३२७ चेंडूत द्विशतक पूर्ण केले. त्याला डॅरेल मिचेलची उत्तम साथ लाभली. या दोघांनी १३३ धावांची भागीदारी रचली. अखेर विल्यमसन २३८ धावांवर बाद झाला.

- Advertisement -

मिचेलने मात्र ११२ चेंडूत १०२ धावांची खेळी केल्यावर न्यूझीलंडने पहिला डाव ६ बाद ६५९ धावांवर घोषित केला. त्यांच्याकडे ३६२ धावांची आघाडी होती. याचे उत्तर देताना पाकिस्तानची तिसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात १ बाद ८ अशी धावसंख्या होती. कायेल जेमिसनने पाकिस्तानचा सलामीवीर शान मसूदला खातेही न उघडता माघारी पाठवले. दिवसअखेर अबिद अली ७ धावांवर नाबाद होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -