हिटमॅन रोहितची ऐतिहासिक कामगिरी

टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज

Rohit Shrama

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसर्‍या टी-२० सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने अर्धशतकी खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. मात्र, त्याची ही खेळी इतर खेळींपेक्षा जरा खास होती. याचे कारण म्हणजे रोहित या खेळीदरम्यानच आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला. त्याने न्यूझीलंडचा फलंदाज मार्टिन गप्टिलला मागे टाकत हा विक्रम आपल्या नावे केला.

या सामन्याआधी आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनण्यासाठी रोहितला ३५ धावांची गरज होती. रोहितने ३३ धावांवर असताना लेगस्पिनर ईश सोधीला षटकार लगावत दिमाखात हा विक्रम आपल्या नावे केला. रोहितने आपल्या टी-२० कारकिर्दीत ९२ सामन्यांच्या ८५ डावांत १६ अर्धशतके आणि ४ शतकांच्या मदतीने २२८८ धावा केल्या आहेत, तर गप्टिलच्या खात्यात ७६ सामन्यांच्या ७४ डावांत २२७२ धावा आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणार्‍या फलंदाजांच्या यादीत तिसर्‍या स्थानी पाकिस्तानचा शोएब मलिक (२२६३) तर चौथ्या स्थानी विराट कोहली (२१६७) आहे.

१०० षटकारांचा टप्पा पार करणारा तिसरा फलंदाज

*९२ सामने
*४ शतके
*१६ अर्धशतके
*२२८८ धावा