घरक्रीडा‘मुंबई श्री’ चा थरार १६, १७ फेब्रुवारीला

‘मुंबई श्री’ चा थरार १६, १७ फेब्रुवारीला

Subscribe

शरीरसौष्ठवातील प्रतिष्ठेची स्पर्धा ‘मुंबई श्री’ चा थरार यंदा १६ आणि १७ फेब्रुवारीला अनुभवायला मिळणार आहे. ही स्पर्धा परळ रेल्वे वर्कशॉपच्या मैदानात रंगणार आहे. यंदा या स्पर्धेला स्पार्टन न्यूट्रिशनचे प्रायोजकत्वही मिळवून दिले आहे. या स्पर्धेमधील विजेत्यांना सुमारे आठ लाखांच्या रोख पुरस्कारांनी गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती स्पर्धा आयोजक प्रभाकर कदम यांनी दिली. तसेच या स्पर्धेला विशेष महत्त्व आहे. कारण या स्पर्धेतूनच आगामी ‘महाराष्ट्र श्री’ स्पर्धेसाठी मुंबईच्या दोन संघांची निवड केली जाणार आहे.

‘मुंबई श्री’ या स्पर्धेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. मागील वर्षापर्यंत मुंबई श्रीचा थरार मुंबईकरांना एकच दिवस अनुभवता येत होता. यंदा मात्र ही स्पर्धा दोन दिवस रंगणार आहे. या स्पर्धेदरम्यान न्यूट्रिशनपासून व्यायामाच्या अत्याधुनिक मशीनपर्यंत तसेच फिटनेस ट्रेनरपासून न्यूट्रिशनिस्ट-डायटेशियनपर्यंत अनेक फिटनेसप्रिय गोष्टींची रेलचेल पाहायला मिळणार आहे.

- Advertisement -
महिला शरीरसौष्ठवपटूंसाठी मिस मुंबई

शरीरसौष्ठव खेळात आता राष्ट्रीय पातळीवर महिलांचे प्रमाण वाढू लागले आहे. मुंबईतही या खेळाकडे करिअर म्हणून पाहणार्‍या महिलांची संख्या झपाट्याने वाढतेय. या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेत ‘मिस मुंबई’ नामक महिलांच्या फिजीक स्पोर्ट्स प्रकाराचाही समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर मॉडेल फिजिक असलेल्या खेळाडूंसाठीही एक गट ठेवण्यात आला आहे. या दोन्ही गटांतील अव्वल पाच खेळाडूंना रोख पुरस्कार देऊन गौरविले जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -