घरक्रीडाद्रविड भारताचा फलंदाजी सल्लागार होणार होता पण

द्रविड भारताचा फलंदाजी सल्लागार होणार होता पण

Subscribe

जुलै २०१७ मध्ये रवी शास्त्री याची भारताच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती केली गेली होती. ही नियुक्ती सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण या तिघांच्या क्रिकेट सल्लागार समितीने केली होती. याचवेळी परदेश दौऱ्यांसाठी राहुल द्रविड याची फलंदाजी सल्लागार म्हणून नियुक्ती झाली होती. पण नंतर त्याच्याजागी संजय बांगरची वर्णी लागली. 

भारताने सध्या सुरू असलेली इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका ३-१ अशी गमावली. त्यामुळे भारतीय संघावर चाहते आणि क्रिकेट समीक्षक टीका करत आहेत. त्यातच रवी शास्त्री यांच्या प्रशिक्षणाबद्दलही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. फलंदाजांनी केलेल्या खराब कामगिरीमुळे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांच्यावरही काहीप्रमाणात टीका होत आहे. २०१७ मध्ये राहुल द्रविडची भारतीय संघाचा फलंदाजी सल्लागार म्हणून नियुक्ती झाली होती. पण त्याने रवी शास्त्रीशी चर्चा झाल्यानंतर हे पद न स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता. या गोष्टीचा उलगडा सौरव गांगुलीने केला आहे. 

शास्त्रीसोबतच्या चर्चेनंतर द्रविडने सोडले पद  

इंडिया टीव्ही या चॅनेलवर बोलताना गांगुली द्रविडच्या नियुक्तीबाबत म्हणाला, “आम्ही द्रविडला भारतीय संघाचा फलंदाजी सल्लागार होण्याबाबत विचारले होते आणि त्याने यासाठी होकार दिला होता. त्यानंतर द्रविडने रवी शास्त्रीशी चर्चा केली. त्यांच्यात काय चर्चा झाली मला माहित नाही. पण या चर्चेनंतर द्रविडने पद सोडले. या गोंधळात आमचेही (क्रिकेट सल्लागार समितीचे) नाव ओढले गेले. याचा आम्हाला कंटाळा आला आणि आम्ही या समितीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे द्रविड भारतीय संघाचा फलंदाजी सल्लागार का नाही याचे उत्तर माझ्याकडे नाही. पण आता भारतीय संघाचे प्रदर्शन सुधारण्याची जबाबदारी शास्त्रीवर आहे.”
सौजन्य – GyanDarbar

परदेशात भारतीय फलंदाजांचे प्रदर्शन निराशजनक

२०१७ मध्ये रवी शास्त्रीला भारताच्या प्रशिक्षक पदी नियुक्त करणाऱ्या समितीमध्ये गांगुलीचा समावेश होता. त्यावेळी परदेशी दौऱ्यांसाठी राहुल द्रविड याची फलंदाजी सल्लागार आणि झहीर खान याची गोलंदाजी सल्लागार म्हणून निवड झाली होती. पण नंतर त्यांच्याजागी संजय बांगर आणि भारत अरुण यांची निवड झाली. भारतीय फलंदाजांना इंग्लंड आणि द.आफ्रिका दौऱ्यांत चांगले प्रदर्शन करता आलेले नाही. कर्णधार कोहली वगळता एकाही फलंदाजाला सातत्यपूर्ण प्रदर्शन केलेले नाही. त्यामुळे काही पृथ्वी शॉ सारख्या नव्या खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -