घरक्रीडाविदर्भाचे पोट्टे भारी; दुसऱ्यांदा जिंकली रणजीची ट्रॉफी

विदर्भाचे पोट्टे भारी; दुसऱ्यांदा जिंकली रणजीची ट्रॉफी

Subscribe

विदर्भाच्या संघाने कर्णधार फैजल फजलच्या नेतृत्वाखाली मानाच्या समजल्या जाणाऱ्या रणजी ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. विदर्भाच्या संघाने सलग दुसऱ्यांदा रणजी करंडक जिंकण्याचा मान पटकावला आहे. रणजीच्या अंतिम सामन्यात विदर्भाने सौराष्ट्रावर ७८ धावांनी मात केली. विदर्भाने जिंकण्यासाठी सौराष्ट्राच्या संघाला २०७ धावांचं टार्गेट दिलं होतं. मात्र, सौराष्ट्रने १२७ धावांमध्येच आपला गाशा गुंडाळला. या सामन्यात विदर्भाचा फिरकीपटू आदित्य सरवटेने मोलाची कामगिरी बजावली. पहिल्या डावात सौराष्ट्राच्या ५ फलंदाजांना माघारी धाडणाऱ्या आदित्यला यश मिळाले तर दुसऱ्या डावातही त्याने ६ फलंदाजांनी बाद केलं.

विदर्भाने फलंदाजी करतेवेळी पहिल्याच डावात आदित्य कर्णेवारच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर ३१२ धावांपर्यंत मजल मारली. मधल्या फळीतल्या फलंदाजांनीही टीमची धावसंख्या वाढवण्यात मोठी कामगिरी बजावली. दरम्यान, सौराष्ट्र संघाने प्रत्युत्तर म्हणून पहिल्या डावात ३०७ धावांपर्यंत मजल मारली. स्नेल पटेलच्या शतकामुळे विदर्भ संघाने काही काळासाठी घेतलेली आघाडी अचानक कोलमडली. कर्णधार जयदेव उनाडकट आणि चेतन साकरिया यांनी अखेरच्या विकेटसाठी भागीदारी रचत विदर्भाच्या गोलंदाजच्या नाकीनऊ आणले. मात्र, त्यानंतर आदित्य सरवटे आणि आणि अक्षय वाखरेच्या भेदक माऱ्यामुळे विदर्भ संघाने पहिल्या डावात ५ धावांची निसटती आघाडी घेतली.

- Advertisement -

दुसऱ्या डावातही आघाडी

विदर्भ संघाच्या अखेरच्या फळीतील फलंदाजांनी दुसऱ्या डावातही बाजी मारत संघाला २०० धावांचा टप्पा गाठून दिला. पहिल्या फळीत गणेश सतीश तर मधल्या फळीतल्या फलंदाजांपैकी मोहीत काळे, आदित्य सरवटे, अक्षय कर्णेवार, उमेश यादव यांनी छोट्या पण महत्वपूर्ण खेळी उभारल्या. २०० धावांवर विदर्भाचा दुसरा डाव आटोपल्यानंतर सौराष्ट्राला विजयासाठी २०६ धावांचं आव्हान मिळालं. मात्र, दुसऱ्या डावातही सौराष्ट्राच्या फलंदाजांची भंभेरी उडाली. पहिल्या डावात सेंच्युरी करणारा स्नेल पटेल दुसऱ्या डावात १२ धावांवर बाद झाला. त्यानंतर चेतेश्वर पुजाराला शून्यावर माघारी धाडत सौराष्ट्राला मोठा धक्का दिला. चवथ्या आणि पाचव्या दिवशीही आदित्य सरवटेने आपल्या खेळाची चमक दाखवली आणि  विदर्भ संघाला यश मिळवून दिले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -