घरक्रीडाअखेर RCBची प्रतिक्षा संपली, ७व्या मॅचमध्ये मिळाला पहिला विजय!

अखेर RCBची प्रतिक्षा संपली, ७व्या मॅचमध्ये मिळाला पहिला विजय!

Subscribe

आयपीएलचा १२वा हंगाम सुरू झाल्यापासून आपल्या पहिल्या वहिल्या विजयासाठी झगडत असलेल्या विराट कोहलीच्या RCB अर्थात रॉयल चॅलेंजर बँगलोरला अखेर त्यांच्या ७व्या मॅचमध्ये पहिला विजय मिळाला आहे. किंग्ज इलेव्हन पंजाब (KXIP) विरूद्धच्या आजच्या मॅचमध्ये कॅप्टन विराट कोहलीनं टॉस जिंकून फिल्डींग करण्याचा निर्णय घेतला. पंजाबच्या बॅट्समन्सला स्वस्तात रोखून ते टार्गेट आपल्या मजबूत बॅटिंगच्या जोरावर सर करण्याचा प्लॅन कोहलीनं केला होता. हंगामात आत्तापर्यंत आरसीबीची बॉलिंग ही त्यांच्यासमोरची मोठी समस्या राहिली आहे. त्यामुळेच आधी बॉलिंग करण्याचा निर्णय कोहलीनं घेतला.

गेल एकटाच नडत होता!

मात्र, सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये प्रभावी वाटणारी आरसीबीची बॉलिंग तिसऱ्या ओव्हरनंतर किंग्ज इलेव्हनचे सलामीवीर ख्रिस गेल आणि के एल राहुल यांनी चोपून काढली. १०च्या रनरेटने रन करणारी ही जोडी फोडली यजुवेंद्र चहलने. सातव्या ओव्हरमध्ये १८ रनांवर के एल राहुल आउट झाला, तेव्हा पंजाबचा स्कोअर होता ६६. एका बाजूने ख्रिस गेल हळूहळू त्याच्या डावाला आकार देत असताना दुसऱ्या बाजूने मात्र ठराविक अंतराने बॅट्समन आऊट होत होते. शिवाय, राहुल-गेल जोडीने सुरुवात केलेला वेग नंतर कमी कमी होत गेला. मयंक अगरवाल(१५), सरफराज खान(१५) आणि सॅम कुरन(१) हे पंजाबचे बॅट्समन स्वस्तात माघारी परतल्यानंतर मनदीप सिंगनं गेलला साथ द्यायला सुरुवात केली.

- Advertisement -

आरसीबीसाठी टार्गेट १७४!

दरम्यानच्या ओव्हरमध्ये खुद्द कॅप्टन कोहलीनं ख्रिस गेलचा एक सोपा कॅच सोडला. त्याचा पुरेपूर फायदा उठवत गेलने ६४ बॉलमध्ये ९९ रनांची जबरदस्त इनिंग खेळली. यामध्ये १० फोर आणि ५ सिक्सचा समावेश होता. गेल-मनदीपने शेवटच्या ६ ओव्हरमध्ये १०च्या रनरेटने ६० रनांची पार्टनरशीप केली. ज्यात एकट्या गेलचे ४२ रन होते! इनिंग संपली तेव्हा पंजाबचं आव्हान १७३पर्यंत पोहोचलं होतं.

जिंकण्यासाठीच उतरलेला विराट!

समोर १७४ धावांचं टार्गेट घेऊन मैदानात उतरलेली आरसीबीची सलामीची जोडी विराट कोहली आणि पार्थिव पटेल यांच्या खेळण्यात जिंकण्यासाठीचा आत्मविश्वास सहज दिसून येत होता. पहिल्याच बॉलवर फोर मारून पार्थिव पटेलनं ते स्पष्ट केलं होतं. पहिल्या ३ ओव्हरमध्येच या दोघांनी ३६ धावा स्कोअरबोर्डवर लावल्या होत्या. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी एकही विकेट गमावली वव्हती. त्यानंतर मात्र कॅप्टन अश्विनने आपल्या हातात बॉल घेतला. आणि त्याचा निर्णय योग्य ठरला. पुढे येऊन मारण्याच्या नादात पार्थिव पटेलनं लाँग ऑनवर उभ्या असलेल्या अगरवालच्या हातात कॅच दिला. आरसीबीला पहिला धक्का बसला.

- Advertisement -

पार्थिव पटेल आऊट झाल्यानंतर आलेला एबी डिव्हिलियर्स पार्थिवपेक्षा आक्रमकपणे खेळायला लागला. पाचव्या ओव्हरमध्येच आरसीबीच्या ५४ धावा झाल्या होत्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -