घरक्रीडाकाश्मीरला सांभाळणं पाकिस्तानला अशक्य - शाहीद आफ्रिदी

काश्मीरला सांभाळणं पाकिस्तानला अशक्य – शाहीद आफ्रिदी

Subscribe

पाकिस्तान स्वत:च्या देशातील नागरीकांचा सांभाळ करु शकत नाही आणि काश्मीर काय सांभाळणार, असे उद्गार पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी याने केली आहे.

भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये काश्मीर हा फार संवेदनशील मुद्दा आहे. काश्मीरला लाभलेले निसर्गसौंदर्य पर्यटनाच्या दृष्टीकोनाने फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे काश्मीर आपल्या देशात यावा, अशी महत्त्वकांक्षा बाळगूण पाकिस्तान विविध शक्कल लढवित आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तान काश्मीरच्या नियंत्रण रेषेभागात विविध दहशतवादी कारवाया करत आहे. काश्मीर हा जितका संवेदनशील तितका भळभलता मुद्दा पाकिस्तानने बनवला आहे. परंतु, काश्मीरचा कारभार सांभाळण्याची पाकिस्तानची पात्रता नसल्याची कबुली खुद्द पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी यांनी केली आहे. आफ्रिदीने एका पत्रकार परिषदेत ही कबूली दिली आहे.

हेही वाचा – पाकिस्ताननं भारतीय हद्दीत घुसवलं हेलिकॉप्टर! पाहा व्हिडिओ

- Advertisement -

काय म्हणाला आफ्रिदी?

सध्या सोशल मीडियावर शाहिद आफ्रिदीचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आफ्रिदी एका पत्रकार परिषदेत बोलत आहे. आफ्रिदी म्हणतो की, ‘काश्मीरला सांभाळणं पाकिस्तानच्या अवाक्याबाहेर आहे. पाकिस्तानकडून देशातील नागरिकांचाच सांभाळ होत नाही. मग पाकिस्तान काश्मीरला कसे सांभाळू शकेल?’. यापुढे तो म्हणतो की, काश्मीर कुणालाच देऊ नका. न भारताला काश्मीर देऊ आणि न पाकिस्तानला. शिवाय, पाकिस्तान स्वत:च्या देशातील नागरीकांचा सांभाळ करु शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार? त्यामुळे काश्मीरला इशू नका बनवू. काश्मीरला विभक्त असा देश बनवा. जेणेकरुन तिथले नागरिक सुखाने राहू शकतील, मग ते कुठल्याही धर्माचे असूदेत. काश्मीरमध्ये माणूसकी जिवंत राहणे फार गरजेचे आहे, असेही आफ्रिदी म्हणाला. याअगोदरही आफ्रिदीने काश्मीरवर टिपण्णी दिली आहे.


हेही वाचा – पुन्हा पाकिस्तानात भारतीय चित्रपट, मालिकांवर बंदी!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -