घरक्रीडाएलावेनिल वालारिवनची सुवर्ण कमाई

एलावेनिल वालारिवनची सुवर्ण कमाई

Subscribe

भारताची २० वर्षीय नेमबाज एलावेनिल वालारिवनने सिनियर विश्वचषकात सुवर्णपदकाची कमाई केली. हे तिचे सिनियर स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक होते. तिने या स्पर्धेत महिलांच्या १० मीटर एयर रायफल प्रकारात हे पदक मिळवले. या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी एलावेनिल ही अंजली भागवत आणि अपूर्वी चंडेला यांच्यानंतर केवळ तिसरी भारतीय नेमबाज आहे. मात्र, असे असतानाही तिला ऑलिम्पिक कोटा मिळाला नाही, कारण चंडेला आणि अंजुम मुद्गिल यांनी मागील वर्षी झालेल्या जागतिक स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर ऑलिम्पिक कोटा मिळवला होता.

चंडेला आणि मुद्गिल या जागतिक क्रमवारीत अनुक्रमे पहिल्या आणि दुसर्‍या स्थानी असल्यामुळे त्या या स्पर्धेत पदक मिळवतील अशी अपेक्षा होती. मात्र, अंतिम फेरीत १६६.८ गुण मिळवणार्‍या मुद्गिलला सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. चंडेलाला अंतिम फेरीही गाठता आली नाही. ती पात्रता फेरीत ११ व्या स्थानी राहिली.

- Advertisement -

या वर्षीपासूनच सिनियर गटात खेळणार्‍या एलावेनिलने १० मीटर एयर रायफलच्या अंतिम फेरीत २५१.७ गुण मिळवत सुवर्णपदक पटकावले. २५०.६ गुण मिळवणार्‍या ब्रिटनच्या सेओनेड मॅकिन्टॉशने रौप्यपदक कमावले. तैवानच्या यिंग-शिन लिनला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -