घरक्रीडाठाण्याच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

ठाण्याच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

Subscribe

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धा

जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत ठाणे जिल्ह्याने बाजी मारली. ठाणे जिल्हा वेटलिफ्टिंग प्रशिक्षण केंद्राच्या कुश पै, प्रणित तव्हारे, रम्या पटेल यांनी विविध वजनी गटांत सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला.

यवतमाळमध्ये नुकत्याच झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्र क्रीडा प्रबोधिनीसह नऊ विभागांतील ३०० हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला. या स्पर्धेत ठाणे जिल्हा वेटलिफ्टिंग प्रशिक्षण केंद्राच्या मुलांनी चमकदार कामगिरी करता पदके पटकावली. तसेच १७ वर्षांखालील मुलींमध्ये वेदिका टोळे, ग्रीष्मा थोरात, प्रांजली पगारे यांनी चौथे स्थान मिळवले. या सर्व खेळाडूंना छत्रपती पुरस्कार विजेत्या प्रशिक्षक मधुरा सिंहासने आणि प्रशिक्षक दत्तात्रय टोळे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

- Advertisement -

पदक विजेत्यांची नावे –

१७ वर्षांखालील मुले : ६७ किलो वजनी गट – वेदिका टोळे (सुवर्णपदक); १७ वर्षांखालील मुले : १०२ किलो वजनी गट – कुश पै (सुवर्णपदक); १९ वर्षांखालील मुले : ७१ किलो वजनी गट – रम्या पटेल (सुवर्ण पदक); १७ वर्षांखालील मुले : ४५ किलो वजनी गट – माही बाभुळकर (कांस्यपदक); १९ वर्षांखालील मुले : ५५ किलो वजनी गट – साई जुंद्रे (कांस्यपदक).

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -