घरक्रीडाकरोनावर मात करण्यासाठी विलगीकरणात राहा!

करोनावर मात करण्यासाठी विलगीकरणात राहा!

Subscribe

करोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. भारतामध्ये करोनाची लागण झालेल्यांचा आकडा २०० च्या पार गेला आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि करोनावर मात करण्यासाठी विलगीकरणात राहण्याचे आवाहन भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी, तसेच अभिनेत्री अनुष्का शर्माने केले. या दोघांनी मिळून सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला.

सध्याची परिस्थिती आपल्या सर्वांसाठीच अवघड आहे. करोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आम्ही स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी घरातच थांबलो आहोत. करोनावर मात करण्यासाठी तुम्हीही घरातच राहणे गरजेचे आहे. आपण सर्वांनी विलगीकरणात राहून स्वतःसाठी आणि इतरांसाठी सुरक्षित वातावरण तयार केले

- Advertisement -

पाहिजे. घरी राहा आणि सुरक्षित राहा, असे विराट आणि अनुष्का यांनी व्हिडीओमध्ये म्हटले.
करोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारकडून खबरदारीची विविध पावले उचलण्यात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात २२ मार्चला सकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत जनता कर्फ्यूची घोषणा केली आहे. या वेळेत कोणीही घराबाहेर पडू नये असे आवाहन त्यांनी देशातील जनतेला केले आहे. जगभरात २ लाखांहून अधिक करोनाचे रुग्ण आढळले असून ९ हजारहून अधिक जणांनी आपले प्राण गमावले आहेत. त्यामुळे आता अधिकाधिक खेळाडू पुढे येऊन चाहत्यांना जबाबदारीने वागण्याचे आवाहन करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -