यंदाचा टी-२० विश्वचषक पुढे ढकलणार? पुढील आठवड्यात होणार घोषणा

Mumbai
t20 world cup

यावर्षीचा ऑस्ट्रेलियामधील टी-२० विश्वचषक होण्याची शक्यता धूसरच आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणारा टी-२० विश्वचषक कोरोनामुळे पुढे ढकलला जाणार आहे. पुढील आठवड्यात याची अधिकृत घोषणा केली जाईल. यामुळे क्रिकेटप्रेमींचा हिरमोड झाला आहे. क्रिकेट प्रशासकांसमोर विशेषत: आयसीसी आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी संबंधित अधिकारी यांच्यासमोर टी-२० विश्वचषक आता केव्हा होणार आहे? असा मोठा प्रश्न उभा आहे.

तीन पर्यायांचा विचार

१. हा विश्वचषक फेब्रुवारी-मार्चमध्ये होण्यास क्रिकेट ऑस्ट्रेलियाला कोणतीही अडचण नाही. पण यात एक समस्या आहे. पुढच्या वर्षीची आयपीएल एप्रिलमध्ये होणार आहे. यामुळे इंग्लंडचा भारत दौराही अडचणीत येऊ शकतो. यासह, प्रसारकांची स्वतःची बाजू देखील आहे.

२. बीसीसीआय ऑस्ट्रेलियाला २०२१ टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन करण्यास सहमती दर्शवायला हवी. या वर्षाच्या अखेरीस भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका व्हावी अशी बीसीसीआयची इच्छा आहे.

३. ऑस्ट्रेलिया २०२०२ ऐवजी २०२२ मध्ये विश्वचषक आयोजित करावं. जर असं झालं तर ते बर्‍याच खेळाडूंना, आयसीसी आणि इतर सर्वांसाठी अनुकूल आहे.


हेही वाचा – धोनीचे भारतीय संघात पुनरागमन अजूनही शक्य!


या वर्षाचा विश्वचषक पुढे ढकलण्याबाबत २६ ते २८ मे दरम्यान घोषणा केली जाऊ शकते. दरम्यान, आयसीसीच्या सदस्य मंडळाशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली जाईल. वास्तविक आयसीसीच्या बैठकीत तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. पहिला टी-२० विश्वचषक पुढे ढकलणं. दुसरं म्हणजे, नवीन चेअरमन पदासाठी निवडणुकीची तारीख निश्चित करणे आणि तिसरं निवडणुकीची तारीख आणि कार्यपद्धती निश्चित करणे.