घरक्रीडायंदाचा टी-२० वर्ल्डकप पुढे ढकलण्याची घाई नको!

यंदाचा टी-२० वर्ल्डकप पुढे ढकलण्याची घाई नको!

Subscribe

मिस्बाह-उल-हकचे मत

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) यंदा ऑस्ट्रेलियात होणारा टी-२० विश्वचषक पुढे ढकलण्याची घाई करता कामा नये, असे मत पाकिस्तान संघाचा प्रशिक्षक मिस्बाह-उल-हकने व्यक्त केले. सध्याच्या घडीला या स्पर्धेचे आयोजन करणे हे मोठे आव्हान असले तरी क्रिकेटला पुन्हा सुरुवात झाल्यावर टी-२० विश्वचषक हीच नजीकच्या काळातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची स्पर्धा आहे. त्यामुळे आयसीसीने हा विश्वचषक पुढे ढकलण्याआधी आणखी वेळ घेतला पाहिजे, असे मिस्बाहला वाटते.

टी-२० विश्वचषकात १६ संघांचा सहभाग असणार आहे. त्यामुळे या स्पर्धेचे आयोजन करणे सोपे नाही. मात्र, या स्पर्धेबाबत कोणताही निर्णय घेण्याआधी अधिकार्‍यांनी आणखी एखाद महिना वाट पाहावी असे मला वाटते. ऑस्ट्रेलियातील टी-२० विश्वचषक व्हावा अशी सर्वांची इच्छा आहे. क्रिकेटला पुन्हा सुरुवात झाल्यावर नजीकच्या काळात याहून मोठी स्पर्धा नाही, असे मिस्बाह म्हणाला.

- Advertisement -

करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणारा टी-२० विश्वचषक लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. याबाबतची अधिकृत घोषणा या आठवड्यात होऊ शकेल. मात्र, हा विश्वचषक पुन्हा कधी घ्यायचा याबाबत आयसीसी अजून चर्चा करत आहे. टी-२० विश्वचषक पुढे ढकलण्यात आल्यास बीसीसीआय या काळात आयपीएलचे आयोजन करु शकेल. करोनामुळे आयपीएलचा यंदाचा मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -