घरक्रीडाथुंकीवरील बंदीचा इंग्लंडमध्ये गोलंदाजांवर परिणाम होणार नाही!

थुंकीवरील बंदीचा इंग्लंडमध्ये गोलंदाजांवर परिणाम होणार नाही!

Subscribe

रूट, नासिर हुसेनचे मत

करोनाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) चेंडूला तकाकी आणण्यासाठी थुकींच्या वापरावर बंदी घातली आहे. त्यामुळे गोलंदाजांचे काम अधिकच अवघड होणार असून चेंडू आणि बॅट यात समतोल उरणार नाही असे बर्‍याच आजी-माजी क्रिकेटपटूंना वाटत आहे. परंतु, इंग्लंडचा सध्याचा कर्णधार जो रूट आणि माजी कर्णधार नासिर हुसेन या मताशी पूर्णपणे सहमत नाहीत. त्याचप्रमाणे इंग्लंडमध्ये खेळताना थुंकीच्या वापरावर बंदी घातल्याचा गोलंदाजांवर परिणाम होणार नाही, असेही हे दोघे म्हणाले.

इंग्लंडमध्ये खेळत असताना चेंडू आणि बॅट यांमध्ये समतोल राहील याची मला खात्री आहे. इंग्लंडमध्ये बरेचदा ढगाळ वातावरण असते आणि हे गोलंदाजांच्या फायद्याचे ठरते. यंदा उन्हाळ्यात फारसे क्रिकेट खेळले गेलेले नाही. त्यामुळे मैदाने खूपच चांगल्या स्थितीत आहेत. त्यांच्यावर खूप गवत आहे. त्यामुळे ४५-५० षटकांपर्यंत ड्युक्सच्या चेंडूवर काहीही परिणाम होणार नाही आणि हे गोलंदाजांच्या पथ्यावर पडू शकेल. चेंडू सातत्याने स्विंग होत राहील. कुकबुरा आणि एसजीच्या चेंडूपेक्षा ड्युक्सचा चेंडू असाही जास्त काळ टणक राहतो. त्यामुळे चेंडूला तकाकी आणण्याची गोलंदाजांना फारशी गरज भासणार नाही. थुंकीच्या वापरावर बंदी घातल्याचा गोलंदाजांवर फारसा परिणाम होणार नाही. सध्याच्या परिस्थितीत सर्वांची सुरक्षितता सर्वात महत्त्वाची आहे. त्यामुळे थुंकीवरील बंदी गरजेची आहे, असे रुटने सांगितले.

- Advertisement -

तसेच थुंकीच्या वापरावर बंदीविषयी नासिर हुसेन म्हणाले की, याचा काही गोलंदाजांवर नक्कीच परिणाम होईल. ज्या गोलंदाजांचा वेग कमी आहे, त्यांचे काम अवघड होऊ शकेल. मात्र, इंग्लंडमध्ये ड्युक्सचा चेंडू वापरला जातो आणि हा चेंडू बराच स्विंग होतो. त्यामुळे इंग्लंडमध्ये खेळताना चेंडूला तकाकी आणण्यासाठी केवळ घामही पुरेसा आहे. गोलंदाजांना इथे मदत मिळत राहील.

स्टोक्स आणि कोहलीत साम्य…

- Advertisement -

करोनामुळे मार्चपासून क्रिकेट बंद आहे. परंतु, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेपासून पुन्हा क्रिकेटला सुरुवात होईल. या मालिकेला ८ जुलैपासून सुरुवात होणार असून इंग्लंडचा कर्णधार जो रुट पहिल्या कसोटीला मुकणार आहे. त्याच्या जागी उपकर्णधार बेन स्टोक्स इंग्लंडचे नेतृत्व करु शकेल. स्टोक्सच्या नेतृत्वात इंग्लंड संघ चांगली कामगिरी करेल असा जो रूटला विश्वास आहे. स्टोक्स कर्णधार म्हणून नक्कीच यशस्वी होईल. त्याच्यात आणि भारताचा कर्णधार विराट कोहलीत साम्य आहे. विराट स्वतः उत्कृष्ट कामगिरी करतो आणि इतरही खेळाडू त्याच्याप्रमाणे खेळतील अशी अपेक्षा करतो. त्याच्याकडून संघातील इतर खेळाडूंना प्रेरणा मिळते. हेच मी स्टोक्सबाबतही बोलू शकतो, असे रूट म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -