घरक्रीडाचाहत्याला देश सोडून जा सांगितल्यामुळे विराट झाला ट्रोल

चाहत्याला देश सोडून जा सांगितल्यामुळे विराट झाला ट्रोल

Subscribe

विराटने चाहत्याला देश सोडून जाण्याचा सल्ला दिल्यामुळे चाहत्यांनी विराटलाच ट्रोल केले आहे.

भारताचा कर्णधार विराट कोहली क्रिकेटच्या मैदानात नवनवे विक्रम करत असतो. त्याच्या सातत्याने धावा करण्याच्या सवयीमुळे त्याचे भारतात आणि जगात अनेक चाहते आहेत. पण काही लोक असेही आहेत जे विराटवर टीकाही करतात. अशाच एका माणसाच्या टीकेचे उत्तर देताना विराटने त्याला देश सोडून जाण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे चाहत्यांनी विराटलाच ट्रोल केले आहे.

तुला माझी फलंदाजी आवडत नाही याचा फरक नाही पडत

विराटच्या ३० व्या वाढदिवसानिमित्त त्याचे अधिकृत अॅप लाँन्च झाले. त्यानिमित्ताने एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. त्यामध्ये एका क्रिकेट चाहत्याने विराटवर टीका केली. ज्यात तो चाहता म्हणाला, “विराटच्या फलंदाजीमध्ये काही खास नाही. मला भारतीय फलंदाजांपेक्षा इंग्लिश आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंची फलंदाजी जास्त आवडते.” यावर विराट त्याला प्रतिउत्तर देताना म्हणाला, “मला नाही वाटत की तू भारतात राहायला पाहिजेस. तुझे जर दुसऱ्या देशावर प्रेम असेल तर तू आमच्या देशात का राहतोस? तुला माझी फलंदाजी आवडत नाही याचा मला फरक नाही पडत.”

विराटच्या या प्रतिउत्तरामुळे चाहत्यांनी त्यालाच ट्रोल केले आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -