युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलची वर्ल्ड कपनंतर वन-डेतून निवृत्ती

Mumbai
Chris Gayle Retire
Chris Gayle

T-20 क्रिकेटमध्ये ताबडतोब फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला वेस्ट इंडिजचा खेळाडू ख्रिस गेल वन-डे क्रिकेटमधून निवृती घेणार आहे. २०१९ च्या वर्ल्ड कपनंतर वन-डे फॉरमॅटमधून निवृत्ती घेणार असल्याचे ख्रिस गेलने काल जाहीर केले. विडिंज क्रिकेटच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही बातमी देण्यात आली आहे. गेलने वन-डेमध्ये आतापर्यंत २८४ सामन्यात ९ हजार ७२७ धावा ठोकल्या आहेत. यामध्ये २३ शतके आणि ४९ अर्धशतकांचा समावेश आहे.

२०१५ चा वर्ल्ड कप झाल्यापासून ख्रिस गेल हा वेस्ट इंडिजसाठी सातत्याने खेळत नव्हता. नावाजलेला फलंदाज असूनही त्याला अनेकदा संघाच्या बाहेर बसावे लागले आहे. २०१५ वर्ल्ड कपमध्ये त्याने द्विशतक झळकावले होते. त्यानंतर दोन वर्षांनी त्याने जुलै २०१७ मध्ये इग्लंड विरुद्धच्या मालिकेत पुनरागमन केले होते. मागच्या वर्षी त्याने विडिंज साठी क्लालिफायर सामने खेळून विंडिजला वर्ल्ड कपमध्ये नेण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली होती.

आपण निवृत्ती घेऊ असे मागच्यावर्षीच ख्रिस गेलने स्पष्ट केले होते. गेलने वेस्ट इंडिजकडून खेळताना T-20 मध्ये शतक, वन-डे सामन्यात एक द्विशतक आणि कसोटी सामन्यात त्रीशतक झळकावले आहे. २००४ साली त्याने वेस्ट इंडिजला चॅम्पियन्स ट्रॉफि जिंकून देण्यात हातभार लावला होता. तसेच दोन वेळा टी-2० वर्ल्ड कप जिंकून देण्यासाठीही महत्त्वाचा वाट उचलला होता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here