घरव्हिडिओबॉर्डर-गावस्कर करंडक भारताकडे  

बॉर्डर-गावस्कर करंडक भारताकडे  

Related Story

- Advertisement -

अजिंक्य रहाणेच्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला १९८८ नंतर पहिल्यांदा गॅबाच्या मैदानावर पराभूत करण्याचा पराक्रम केला. या ऐतिहासिक विजयासह भारताने चार सामन्यांची कसोटी मालिका २-१ अशी आपल्या खिशात घातली. गॅबावर झालेला चौथा कसोटी सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाने भारतापुढे ३२८ धावांचे आव्हान ठेवले होते. युवा सलामीवीर शुभमन गिलने ९१ धावांची खेळी करत भारताला चांगली सुरुवात करून दिली. तो बाद झाल्यानंतर चेतेश्वर पुजारा (५६) आणि रिषभ पंत (नाबाद ८९) यांच्या महत्वपूर्ण खेळींमुळे भारताने ३२८ धावांचे लक्ष्य ३ विकेट राखून गाठले.

- Advertisement -