Tuesday, January 12, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई सलमान खानच्या 'शेरा'चा शिवसेनेत प्रवेश

सलमान खानच्या ‘शेरा’चा शिवसेनेत प्रवेश

बॉलिवूड स्टार सलमान खानचा विश्वासू बॉडिगार्ड गुरमीत सिंग उर्फ शेराने शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Related Story

- Advertisement -

विधानसभा निवडणूक अंतिम टप्प्यावर येऊन ठेपली आहे. येत्या सोमवारी सकाळपासून मतदान सुरु होणार आहे. तरीही शिवसेना पक्षात इनकमिंग सुरुच आहे. शुक्रवारी रात्री उशिरा बॉलिवूड स्टार सलमान खानचा विश्वासू बॉडिगार्ड गुरमीत सिंग उर्फ शेराने शिवसेनेत प्रवेश केला. यासंदर्भात शिवसेनेने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर रात्री उशिरापर्यंच माहिती दिली. सलमान खानचा जवळचा आणि विश्वासू व्यक्ती म्हणून शेराची ओळख आहे. तो गेल्या २२ वर्षांपासून सलमान खानचा बॉडिगार्ड म्हणून काम पाहत आहे. शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी त्यांच्या उपस्थितीत शेराने शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शेराच्या हातात शिवबंधन बांधले.

- Advertisement -

राज्यभरात सध्या विधानसभा निवडणुकीचे वातावरण आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. प्रत्येक पक्षाचे बडे नेते प्रचारामध्ये व्यग्र आहेत. प्रचारसभांमध्ये सेलेब्रेटींच्या सहाय्याने देखील मत मागितले जाते. त्यामुळे आज शेवटच्या दिवशी होणाऱ्या प्रचार रॅलीमध्ये शेरा मतदारांना शिवसेनेला मतदानाचे आवाहन करण्याची शक्यता आहे. याशिवाय आज संध्याकाळी पाच वाजेपासून सर्व प्रकारचे प्रचार बंद होणार आहेत. त्यामुळे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सर्व पक्ष प्रचारासाठी कंबर कसणार आहेत.


हेही वाचा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी

- Advertisement -